मुंबई : शिवसेना हे नाव ठेवताना छत्रपती शिवरायांच्या वंशजांना विचारलं होतं का या उदयनराजेंच्या प्रश्नाला शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut Vs Udayanraje Bhonsale) यांनी उत्तर दिलं आहे. उदयनराजेंनी हा प्रश्न विचारण्याआधी त्यांनी कोल्हापूरच्या शाहू महाराजांशी चर्चा करावी, असं संजय राऊत म्हणाले. राऊत यांनी (Sanjay Raut Vs Udayanraje Bhonsale) आज पत्रकार परिषद घेऊन उदयनराजेंनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली.
संजय राऊत म्हणाले, “कोल्हापूरचे सध्याचे शाहू महाराज यांचे आणि बाळासाहेबांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. खासदार संभाजीराजेंचे वडील शाहू महाराज यांनीदेखील शिवसेनेत प्रवेश करत शिवसेनेच्या कार्याला सुरुवात केली होती. त्यामुळे साताऱ्याच्या राजांकडून हा जो प्रश्न विचारण्यात आला आहे, की परवानगी घेतली होती का? खरं म्हटलं तर हा प्रश्न विचारण्याआधी त्यांनी आपले प्रमुख शाहू महाराज यांच्याशी याविषयी चर्चा करायला हवी होती”
कल्पनाराजे शिवसेनेच्या उमेदवार
कोल्हापूर, साताऱ्याच्या गादीचा आम्हाला आदर आहे. खा.छत्रपती संभाजीराजे माझे मित्र आहेत. सातारचे शिवेंद्रराजे संयमाने काम करतात. अभयसिंहराजेंसारखा सज्जन माणूस राजकारणात नव्हता. उदयराजेंनी छत्रपती शाहूंना प्रश्न विचारायला पाहिजे. उदयनराजेंच्या मातोश्री कल्पनाराजे भोसले या शिवसेनेच्या लोकसभेच्या उमेदवार होत्या, अशीही आठवण संजय राऊतांनी करुन दिली.
उदयनराजे भोसले जर बाळासाहेब ठाकरेंबद्दल बोलत असतील,शरद पवारांबाबत बोलत असतील, उद्धव ठाकरेंबद्दल बोलत असतील तर आम्हालाही लोकशाहीत उत्तर देण्याचा अधिकार आहे. तुम्ही जर इतरांच्या श्रद्धास्थानाबद्दल बोलत असाल, तर तुम्हालाही ऐकून घ्यावं लागेल. आम्ही तुमचा आदर राखतो, तुम्ही आमचा राखा. तंगडे तोडण्याची भाषा महाराष्ट्रात चालत नाही, कारण तंगडी सगळ्यांना आहेत”, असं संजय राऊत (Sanjay Raut vs Udayanraje Bhonsale) म्हणाले.
उदयनराजे काय म्हणाले होते?
दरम्यान, उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना, शरद पवार आणि संजय राऊत यांच्यावर हल्ला चढवला होता.
शिवसेना जेव्हा काढली त्याला नाव दिले तेव्हा तुम्ही वंशजाना विचारायला आला होता का, महाशिवआघाडी नाव ठेवले तेव्हा विचारले का? शिव का काढून टाकले? सोईप्रमाणे हे लोक वापर करतात, ही यांची लायकी. शिव वडा, हे वडा अरे महाराजांना काय आदराचे स्थान ठेवा ना, वडा पवा हे काय? आमदार प्रकाश गजभिये यांच्यावर टीका करताना थर्डक्लास कोणतरी आहे, असं उदयनराजे म्हणाले. याशिवाय दादरला मोठं शिवसेना भवन आहे, तिथं महाराज कुठं आहेत बघा, खाली कोण आहे वरती कोण आहे. शिवसेना भवनावर महाराजांची मूर्ती खाली, वरती फोटो कुणाचा पाहा, असंही उदयनराजेंनी नमूद केलं होतं.
संबंधित बातम्या
जाणता राजा फक्त छत्रपती शिवराय, उदयनराजेंचा हल्लाबोल, पवार, ठाकरेंवर घणाघात