संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर मंगळवारी ईडीकडून (ED) कारवाई करण्यात आली आहे. राऊत यांची अलिबाग आणि मुंबईमधील संपत्ती इडीकडून जप्त करण्यात आली आहे. ईडीने कारवाई केल्यानंतर आज पुन्हा एकदा संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत यांनी भाजप आणि किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. INS विक्रांतसाठी सोमय्या यांनी पैसे जमवले, मात्र ते राजभवनापर्यंत पोहोचलेच नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. राजभवनात पैसे जमा न झाल्याच्या खुलाशाचे पत्र देखील आपल्याकडे असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. INS विक्रांतसाठी जो निधी जमा करण्यात आला आहे, त्यामध्ये 57 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. हा देशद्रोह आहे. महात्मा’ सोमय्यांवर याप्रकरणात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी राऊत यांनी केली आहे.
INS विक्रांतच्या जतनासाठी पैसे जमवण्यात आले. या कामात किरीट सोमय्या यांनी पुढाकार घेतला. लाखो लोकांनी पैसे दिले. मात्र हे पैसे राजभवनात पोहोचलेच नाही, या पैशांचे पुढे काय झाले असा सवाल राऊत यांनी केला आहे. या प्रकरणात 57 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. विक्रांतशी देशातील नागरिकांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. ते देशाच्या संरक्षण शक्तीचे एक प्रतिक आहे. त्याच्यामध्ये जर घोटाळा होत असेल तर हा देशद्रोह ठरतो. त्यामुळे किरीट सोमय्या यांच्यावर देशद्राहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी राऊत यांनी केली आहे.
संजय राऊत यांनी यावेळी ईडीवर देखील निशाणा साधला आहे. केंद्रीय तपास यंत्रणा जर खरच निपक्षपाती असतील तर त्यांनी या प्रकरणाचा तपास करावा असे आवाहान राऊत यांनी केले आहे. विक्रांतच्या संवर्धनासाठी कोट्यावधी रुपये जमा करण्यात आले, मात्र ते राजभवनापर्यंत पोहोचलेच नाहीत तर मग हे पैसे गेले कुठे असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे. राऊत यांच्यावर मंगळवारी इडीकडून कारवाई करण्यात आली आहे, त्यांची अलिबाग आणि मुंबईमधील संपत्ती इडीकडून जप्त करण्यात आली आहे. संपत्ती जप्त करण्यात आल्यानंतर आज संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप आणि किरीट सोमय्यांवर जोरदार निशाणा साधला आहे.
मशिदीवरील भोंग्याच्या मुद्द्यावरुन पुणे मनसेत अंतर्गत वाद! वसंत मोरे नाराज, मनसे मात्र भूमिकेवर ठाम