मुंबई : (ED Office) ‘ईडी’ने संजय राऊतांच्या जामिनाला केवळ विरोधच दर्शवला नाहीतर त्यांच्यासमोरील अडचणीही वाढवल्या आहेत. (Court) कोर्टाच्या आदेशाप्रमाणे ईडी कार्यालयाला (Sanjay Raut) संजय राऊतांनी केलेल्या जामिनाच्या अर्जावर उत्तर देणे गरजेचे होते. त्यानुसार ईडीने जामिनासाठी तर विरोध केलाच पण आता त्यांच्या विरोधात आरोपपत्रही दाखल केले आहे. पत्राचाळ प्रकरणी हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे संजय राऊत यांचा थेट पत्राचाळ घोटाळ्यात सहभाग होता का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
आतापर्यंत पत्राचाळ घोटाळा प्रकरणी राऊतांची केवळ चौकशी सुरु होती. पण ईडीच्या आरोप पत्रामध्ये राऊतांचाही यामध्ये थेट सहभाग होता असे म्हटले गेले आहे. त्यामुळे ज्या दिवशी राऊतांना दिलासा मिळेल असे चित्र होते त्याच दिवशी त्यांच्या अडचणीत भर पडली आहे.
पत्राचाळ घोटाळा प्रकरणी प्रवीण राऊत यांच्या विरोधात दोष आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. मात्र, संजय राऊत यांच्या अटकेनंतर आता चौकशी सुरु असतानाच त्यांच्याकडे असलेल्या पुराव्यावर आरोपपत्र दाखल केले आहे. त्यामुळे यापुढे राऊतांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचेच चित्र आहे. पीएमएलए कोर्टांमध्ये हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.