मुंबई – काल संजय राऊत (sanjay raut) यांनी दादर (dadar) येथील शिवसेना भवनात (shivsena bhavan) पत्रकार परिषद घेणार असल्याचे जाहीर केल्यापासून तापलेलं राजकारण नेमकं कोणत्या बाजूला वळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. कारण भाजपाचे किरीट सोमय्या यांना पुण्यात धक्काबुक्की झाल्यापासून राजकारण एका वेगळ्या वळणाला जाईल अशी शंका व्यक्त केली होती. ते खरं ठरताना दिसत आहे, त्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना आलेले पत्र यावरून राजकारण किती तापलं आहे हेही आपण पाहिल आहे. त्यातचं काल नाना पटोले यांच्या घरासमोर भाजपच्या नेत्यांनी केलेले आंदोलन त्यानंतर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर काँग्रेसच्या नेत्यांनी केलेलं आंदोलन त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिक गरम झालं आहे. त्यातचं आज शिवसेना सेनाभवनात राज्यात मोठ्या नेत्यांना घेऊन काय निर्णय घोषित करणार याची उत्सुकता लोकांना वाटतं आहे. शिवसेनेच्या पत्रकार परिषदेत नेमकी कोणाची नाव जाहीर होणार हेही पाहावं लागणार आहे. कारण आत्तापर्यंत भाजपाने अनेकांना राष्ट्रीय एजन्सीजकडून घाबरवलं जात असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं होतं. त्यामुळे अनेकांचे डोळे 4 वाजता होणा-या पत्रकार परिषदेकडे लागले आहेत. राऊत यांनी कालपासून अनेक ट्विट केले असून त्यांची चर्चा देखील आहे.
शाख़ों से टूट जाएँ वो पत्ते नहीं हैं हम
आँधी से कोई कह दे कि औक़ात में रहे– राहत इंदौरी pic.twitter.com/bD1c1qGMLb
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 15, 2022
घोटाळे बाजांना जेल मध्ये पाठवणार
महाविकास आघाडीच्या सरकारने अनेक प्रकरणामध्ये घोटाळा केला असल्याचे भाजपाचे नेते किरीट सोमय्या वारंवार सांगत असल्याचे आपण पाहतोय. कारण किरीट सोमय्यांनी आत्तापर्यंत महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवरती आरोप केल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक कागदपत्रे सुध्दा त्यांच्याकडे असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे किरीट सोमय्यांनी केले आरोप पोकळ नसावे अशी सुध्दा चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीचं रंगल्याचे पाहायला मिळत आहे. कारण अनेकांना खडी फोडायला पाठवल्याशिवाय मी शांत बसणार नाही असं ते वारंवार सांगत आहे. पुण्यात महानगर पालिकेत प्रवेश करीत असताना त्यांना धक्काबुक्की झाल्याने मला मारण्याचा त्यांचा कट होता असं त्यांनी नुकतंच म्हणटलं आहे. काल ते माध्यमांशी बोलताना म्हणत होते की, मला त्यांनी कितीही त्रास दिला किंवा मारण्याचा प्रयत्न जरी केला तरी मी शांत बसणार नाही. सगळ्यांना जेलमध्ये पाठवूनचं मी शांत बसणार आहे.
NO HOLDS BARRED !
Will be addressing a Press Conference tomorrow 4 pm at Shivsena Bhawan.
Watch this space !
Jai Maharashtra ! pic.twitter.com/xhJkDGNkJK
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 14, 2022
आज होणार पत्रकार परिषद
महाविकास आघाडीच्या नेत्यांना आणि त्यांच्या नातेवाईकांना राष्ट्रीय एजन्सीकडून वारंवार त्रास दिला जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी भाजपवरती केला आहे. तसेच संजय राऊत हे वारंवार किरीट सोमय्यांना प्रत्युत्तर देत असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण किरीट सोमय्यांना ज्यावेळी धक्काबुक्की झाली त्यानंतर संजय राऊत यांना धमकी पत्र मिळालं होतं. त्यानंतर महाराष्ट्रातलं राजकारण अधिक तापलं असल्याचं पाहायला मिळालं. हे सगळ कोण करतंय हे देखील त्यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं. पण त्या व्यक्तीचं नाव त्यांनी घेतलं नव्हतं. कारण आत्तापर्यंत अनेक नेत्यांना अशा धमक्या आल्या होत्या. आज होणार पत्रकार परिषदेत त्या साडेतीन लोकांची नाव जाहीर करणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितलं असल्याने सगळ्यांचं लक्ष पत्रकार परिषदेकडे लागले आहे.