मुंबई : शिवसेना नेत्या संजय राऊतांच्या(Sanjay Raut)हे सध्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी आर्थर रोड जेलमध्ये आहेत. त्यांचा जामीन कोर्टाने फेटाळला आहे. यामुळे संजय राऊतांची दिवाळी जेलमध्ये होणार आहे. संजय राऊत जेलमध्ये असले तरी त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. कार्यकर्त्यांनी मोठे बॅनर लावून संजय राऊत यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 60 वर्षानंतर संजय राऊत पहिल्यांदा दिवाळीला घरी नाहीत. यामुळे राऊत कुटुंबिया नाराज आहेत. त्यांची आई त्यांची वाटच पाहत आहे. तर, त्यांचे कार्यकर्ते देखील त्यांच्या प्रतिक्षेत आहेत.
आपले नेते संजय राऊत लवकरच जेलमधून बाहेर येतील असा विश्वास या कार्यकर्त्यांना वाटत आहे. भांडुप मध्ये संजय राऊत यांच्या कार्यकर्त्यांकडून मोठी बॅनरबाजी करण्यात आली आहे.
मुंबईतील भांडुप मध्ये संजय राऊत यांच्या घराजवळ कार्यकर्त्यांनी मोठे बॅनर लावले आहेत. या बॅनरवर संजय राऊत यांचा मोठा फोटो पाहायला मिळत आहे. या बॅनरद्वारे संजय राऊत यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
संजय राऊत यांना अटक झाली तेव्हा देखील कार्यकर्त्ये मोठ्या संख्यने त्यांच्या पाठीशी उभे राहिले होते. संजय राऊतांवर ईडीची कारवाई झाली तेव्हा देखील कार्यकर्त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले होते.
31 जुलै 2022 रोजी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या भांडूप येथील मैत्री बंगल्यावर सकाळी 7 वाजता ईडीने धाड टाकली. तब्बल साडेनऊ तासांच्या झाडाझडतीनंतर ईडीने राऊत यांना ताब्यात घेण्यात आले.
यानंतर राऊत यांची दक्षिण मुंबईतील बॅलार्ड पियर येथील ईडीच्या कार्यालयात चौकशी करण्यात आली. त्यानंतर मध्यरात्री रात्री 12 वाजून 40 मिनिटांनी राऊतांना अटक झाली. गोरेगावच्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी राऊत यांना ही अटक करण्यात आली आहे.