मंत्रिमंडळाचा विस्तार कधी?, आजच निरोप जातील; संजय शिरसाट यांनी वार, वेळच सांगून टाकली

| Updated on: Jul 13, 2023 | 3:29 PM

अजित पवार आणि प्रफुल पटेल हे सत्तेत आल्यानंतर सदिच्छा भेट म्हणून अमित शाह यांना भेटायला गेले होते. नेते म्हटलं तर राजकीय चर्चा आलीच, असं ते म्हणाले.

मंत्रिमंडळाचा विस्तार कधी?, आजच निरोप जातील; संजय शिरसाट यांनी वार, वेळच सांगून टाकली
sanjay shirsat
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई, दिनांक 13 जुलै 2023 : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल हे काल दिल्लीत गेले होते. दिल्लीत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा केली. या बैठकीत शाह यांनी मंत्रिमंडळ विस्ताराला हिरवा कंदिल दिला. त्यामुळे आजच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं सांगितलं जात होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांना फोन केल्याने ही शक्यता अधिक बळावली होती. त्यानंतर विस्तार पावसाळी अधिवेशनानंतर होणार असल्याची बातमी धडकली. या सर्व चर्चा सुरू असतानाच आता मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

मंत्रिमंडळ विस्तार अधिवेशनाच्या नंतरपर्यंत आता लांबणार नाही तो उद्याच होणार हे आता ठामपणे सांगतोय. सगळी चर्चा पूर्ण झालेली आहे, आता फक्त मंत्रिमंडळ विस्तार होईल आणि एकत्रित खातेवाटप होईल. मंत्रिमंडळ विस्ताराला आता उशीर होणार नाही. तो उद्या सकाळी 11 वाजता होणार आहे. आज सगळ्यांना निरोप जातील, असं शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी सांगितलं. ते मीडियाशी संवाद साधत होते. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार उद्याच होणार असल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब झालं आहे.

हे सुद्धा वाचा

टाळ्या वाजवत बसा

अजित पवार आणि प्रफुल पटेल हे सत्तेत आल्यानंतर सदिच्छा भेट म्हणून अमित शाह यांना भेटायला गेले होते. नेते म्हटलं तर राजकीय चर्चा आलीच, असं ते म्हणाले. शिंदे गटात कुठलीही नाराजी किंवा अस्वस्थता नाही. संजय राऊत यांनी दुसऱ्याच्या घरात डोकावू नये, भडका उडालाय, हाणामाऱ्या करतायत अस सांगून ते वातावरण बनवत आहेत. पण ते आमच्या मर्दानगीचं लक्षण आहे. त्यांनी फक्त टाळ्या वाजवत बसा. स्वतःच घर जळलं तरी दुसऱ्यांची घर जळत असताना आनंद साजरा करणारी राऊतांची औलाद आहे, अशी शिरसाट यांनी केली.

वरिष्ठ निर्णय घेतील

यावेळी त्यांनी आशिष जैस्वाल यांच्या विधानावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. जो उठाव झाला तो कुण्या एकट्यामुळे झाला नाही. सर्वांचं त्यात समान योगदान आहे. सगळे सोबत होते म्हणून हे घडलं. मंत्रिपद मिळावं ही सर्वांची इच्छा असते. पण कोणाला काय द्यावं हे सगळं वरिष्ठ नेते ठरवतात. ते निर्णय घेतीलच, असं त्यांनी स्पष्ट केलं.