“नाना पटोलेंसारखा बळजबरीने महामोर्चात सहभागी”, शिंदेगटाच्या बड्या नेत्याचा दावा

| Updated on: Dec 17, 2022 | 2:34 PM

शिंदेगटाचे आमदार संजय शिरसाट यांची महामोर्चावर टीका...

नाना पटोलेंसारखा बळजबरीने महामोर्चात सहभागी, शिंदेगटाच्या बड्या नेत्याचा दावा
Follow us on

मुंबई : महापुरुषांच्या अवमानाच्या निषेधार्थ महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) ‘महामोर्चा’ (Mahamorcha) काढला आहे. या मोर्चावर शिंदेगटाच्या नेत्याने टीका केली आहे. “नाना पटोलेंसारखा (Nana Patole) निष्ठावंत, स्वाभिमानी नेता बळजबरीने महामोर्चामध्ये सहभागी झाली आहेत”, असं म्हणत शिंदेगटाचे आमदार संजय शिरसाट यांनी महामोर्चावर भाष्य केलंय.

राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना या तिन्ही पक्षांनी मोर्चा काढला असला तरी, त्यांची मतं मात्र वेगळी आहेत. त्यांच्यात मतभेद आहेत, असं शिरसाट म्हणाले आहेत.

अनेक लोक मोर्चापासुन पळवाट काढण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना या मोर्चात सहभागी व्हायचं नव्हतं. पण त्यांना जबरदस्तीने आणलं गेलं आहे, असं शिरसाट यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत स्वतःला स्टार प्रचारक समजतात. ते मोर्च्याला चालले नाहीत तर शूटिंगला चालले आहेत. कॅमेरा आपल्यावर कसा असावा आणि मी मोर्चामध्ये जाण्यासाठी घरातून मेकअप करून निघाले आहेत. संजय राऊत यांनी बेताल व्यक्तव्य केली. त्यांच्याबद्दल बोलायची आम्हाला लाज वाटत आहे, असं म्हणत शिरसाट यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे.

आज जे मोर्चा काढत आहेत, यांनीच आदिवासीवर गोळीबार केला. याच लोकांनी ओबीसी आरक्षणाला खोड घातली आहे. याच लोकांनी दलित सवर्ण वाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या वेळेस तब्बल अठरा वर्ष घडवला होता. आज जे शेतकरी आत्महत्या करत आहेत त्यामध्ये 90 टक्के मराठा समाजाचे लोक आहेत. त्यांच्याकडे यांचं लक्ष नाही. महाविकासच्या लोकांना आता लोकांमध्ये स्थान राहिले नाही, ते आता संधीचे सोने करण्याचा प्रयत्न करतात त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असंही शिरसाट म्हणालेत.