मुंबई – राजकीय नेत्यांचं (Politics leader) आत्तापर्यंत फोनवरील बोलणं व्हायरल झालं आहे. आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी त्यांच्या विधानसभा क्षेत्रातील एका डॉक्टरला (Doctor) पेशंट सोडून द्या म्हणून केलेल्या कॉलचं रेकॉर्डिंग व्हायरल झालं आहे. त्यामध्ये ज्यांची आई वारली आहे त्यांना आमदार बांगर यांनी आधार दिला आहे आणि पेशंट घरी घेऊन जाण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर डॉक्टरला पेशंट सोडून देण्यास सांगितले आहे. त्यांचा कॉल रेकॉर्ड सगळीकडे व्हायरल झाला असून त्यांच्या मतदारसंघात त्यांचं कौतुक केलं जात आहे. शिवसेना सोडून शिंदे गटात सामील झाल्यानंतर त्यांच्यावरती अनेक कार्यकर्ते नाराज असल्याची माहिती मिळाली होती. मागच्या आठवड्यात त्यांनी ठाण्यात येऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. तसेच आम्ही का वेगळे झालो हेही सांगितलं होतं.
दवाखान्यात आमची आई वारली. दोन तीन दिवस तीस हजार रुपये घातले. दोन तीन दिवसात वेगळ्या तपासण्या केल्या आहेत. काल म्हणे आता तुम्ही दहा हजार रुपये भरा. त्यानंतर बांगर यांनी कोणत्या दवाखान्यात पेशंट असल्याचं विचारलं. माधव हॉस्पिटल आहे. तब्येत कशी आहे. नाही ती वारली आहे. मग एक रुपाया द्यायचा नाही. पेशंट घेऊन निघा…ते म्हणतात पाच हजार रुपये भरा..एक रूपाया द्यायचा नाही. सांगा त्यांना आमदार बांगर यांनी फोन केला होता. त्याला काय विचारायचं नाही आपलं पेशंट घरी घेऊन जा…
डॉक्टर बोईटे बोलतोय, हा आमदार बांगर बोलतोय…ज्या द्याना त्या पेशंटला मेलंय तरी पैसे घेता त्याच्याकडून…त्याला सांगताय त्यांना सांगता पिवळ्या कुपनवरती तुमचं होणार आहे. चालू झालं का पिवळं कुपन पुन्हा…बंद करावं लागलं मगं…बघा आता मग..न्हाय तुम्ही जर मेलाच्या नंतर जर पैसे घेत असाल तर तर तुमच्या सारखं लुचाट माणस कुठ नाहीत. द्याना त्यांना सोडून ठीक आहे. लाज वाटायला पाहिजे…द्या सोडून त्याला..