आता पैसा किती खर्च करतात, यावर इलेक्टिव मेरिट ठरतं, पोपटराव पवारांनी मांडलं निवडणुकांचं वास्तव

| Updated on: Dec 13, 2021 | 6:43 AM

हिवरेबाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार (Popatrao Pawar ) यांनी पूर्वी लोकप्रतिनिधीचे इलेक्टिव्ह मेरिट (Elective Merit) हे त्याच्या भरीव विकास कामांवर ठरत होतं. पण आज ते तुम्ही निवडणुकीत खर्च किती करू शकतात, यावर ठरतं, असं मत मांडलं आहे.

आता पैसा किती खर्च करतात, यावर इलेक्टिव मेरिट ठरतं, पोपटराव पवारांनी मांडलं निवडणुकांचं वास्तव
पोपटराव पवार
Follow us on

जळगाव: हिवरेबाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार (Popatrao Pawar ) यांनी पूर्वी लोकप्रतिनिधीचे इलेक्टिव्ह मेरिट (Elective Merit) हे त्याच्या भरीव विकास कामांवर ठरत होतं. पण आज ते तुम्ही निवडणुकीत खर्च किती करू शकतात, यावर ठरतं, असं मत मांडलं आहे. सरपंच परिषद मुंबईच्या वतीने जळगावात (Jalgaon) आयोजित जिल्हा सरपंच मेळाव्यात ते बोलत होते. निवडणूक ही गाव आणि राष्ट्र उभारणीसाठी असावी, असेही त्यांनी सांगितले.

चुका दाखवण्यापेक्षा समन्वयानं काम करण्याची गरज

पोपटराव पवार यांनी या मनोगतातून आजच्या निवडणुकीत पैसा खर्च करुन विजयी होणार्‍यांना टोला लगावला असल्याचे बोलले जात आहे. पैसा ही विकासासाठी समस्या नाही, गावाचा विकास करण्यासाठी मानसिकता असणे ही मोठी समस्या, टीका टीपण्णी करण्यापेक्षा,इतरांच्या चुका दाखविण्यापेक्षा समन्वयाने काम करा, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत या तिघांनी एकत्र येवून काम केले तरच स्वावलंबी गाव आणि बलशाली भारताचे स्वप्न पूर्ण करु शकतो, असेही हिवरेबाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांनी म्हणाले.

कामाला विरोध करुन सत्तेत जाण्याचा मार्ग सुरु

अलीकडच्या काळात कामाला विरोध करुन सत्तेत जाण्याचा मार्ग राहिला आहे. निवडणूक प्रक्रिया ही गाव आणि राष्ट्र उभारणीसाठी असली पाहिजे. निवडणुकीची व्यवस्था खूप बदललीय, आपण निवडून आलेल्या प्रतिनिधीला विधानसभेत जाऊन भाषण करण्याची संधी देत नाही. लोकप्रतिनिधींना शनिवार आणि रविवारी मतदारसंघात यावं लागतं. अंत्यविधी, दशक्रिया विधी, लग्न, वाढदिवस, बारसं, सण आणि उत्सव या व्यक्तिगत कामासाठी लोक प्रतिनिधींना बोलवतो. आपण वैयक्तिक कामासाठी लोक प्रतिनिधींना बोलवतो मात्र सामुदायिक कामासाठी बोलावलं पाहिजे, असं पोपटराव पवार म्हणाले. हे चित्र येणाऱ्या काळात बदलेलं असं आपण आशावादी राहुया, अंस पोपटराव पवार म्हणाले.

सरपंच परिषदेचा महाविकास आघाडी सरकारला अल्टीमेटम

जळगावात रविवारी सरपंच परिषदेच्या जळगाव जिल्हा शाखेतर्फे जिल्हाभरातील सरपंचाचा मेळावा पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे उपस्थित होते. मेळाव्यात काकडे यांनी मनोगतात बोलतांना सुध्दा उपस्थितीत मंत्री गुलाबराव पाटील यांचे सरपंचांसह ग्रामपंचायतीच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधले. त्यानंतर पत्रकारांशी बोलतांन काकडे म्हणाले की, वित्त आयोगाच्या रकमेत कपात करण्यात येत आहे. या वित्त आयोगाच्या रकमेत कपात करण्यात येवू नये यासह दहा ते 12 मागण्या असून त्याबाबत केंद्र शासन तसेच राज्य सरकारकडे पाठपुरावा करत आहोत. मात्र अद्यापर्यत मागण्या मान्य झालेल्या नाहीत. मागण्या मान्य न झाल्यास विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यातील सर्व ग्रामपंचायत एक दिवस बंद ठेवण्यात येणार आहे, असे दत्ताभाऊ काकडे म्हणाले.

इतर बातम्या:

MHADA exams | म्हाडा भरती पेपर फुटीचा प्रयत्न, मोठे मासे गळाला, पुण्यात तिघा जणांना अटक

शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील पुस्तकांचा भार कमी होणार; एक पाठ्यपुस्तक योजना सुरु होणार

Sarpanch Popatrao Pawar said now money decided elective merit not development works