सातारा : कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी पुन्हा डॉ. सुरेश भोसले यांची निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी जगदीश जगताप यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. नुकतंच या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन या नवीन संचालक मंडळाची निवड जाहीर करण्यात आली आहे. (Satara Karad Yashwantrao Mohite Krishna sugar mill Suresh Bhosale has been selected as a president)
अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या निवडी जाहीर
काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक तिरंगी निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत डॉ. अतुल भोसले यांच्या सहकार पॅनलने सर्वच्या सर्व 21 जागा़ंवर अकरा हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवला होता. यानंतर नव्याने निवडून आलेल्या संचालक मंडळाची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बैठक घेतली. या बैठकीदरम्यान अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या निवडी जाहीर केल्या.
यावेळी कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी पुन्हा डॉ. सुरेश भोसले यांची निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी जगदीश जगताप यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
आता आमची जबाबदारी वाढली – सुरेश भोसले
दरम्यान मोठ्या मताधिक्याने सभासदाने आम्हाला निवडून दिले असल्याने आता आमची जबाबदारी वाढली आहे. या जबाबदारीची जाणीव नवीन संचालक मंडळाला आहे. त्यामुळे आता त्यादृष्टीने कारखान्याच्या हितासाठी आणि प्रगतीसाठी लगेचच कार्यरत होत आहे, अशी प्रतिक्रिया अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर डॉक्टर सुरेश भोसले यांनी दिली.
कराडच्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक 29 जून रोजी पार पडली. त्यावेळी तब्बल 34532 सभासदांनी मतदान केले होते. आता या निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले आहेत. मतमोजणीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत डॉ. अतुल भोसले यांच्या सत्ताधारी जयवंतराव भोसले सहकार पॅनेलने सर्व 21 जागांवर दहा हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. मतमोजणीच्या सुरुवातीपासून सहकार पॅनेलचे उमेदवार आघाडीवर असल्यामुळे दुपारपासूनच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष सुरु केला होता. रात्री उशीरापर्यंत मतमोजणी सुरू होती. आता निकाल स्पष्ट झाले आहेत.
सातारा-सांगली जिल्ह्यात 47145 सभासद असणाऱ्या कराडच्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजप नेते डॉ. अतुल भोसले यांच्या सत्ताधारी जयवंतराव भोसले सहकार पॅनेलने दणदणीत विजयी मिळवला. या निवडणुकीत मिळालेलं मताधिक्य आतापर्यंतच्या इतिहासात सर्वात जास्त आहे. या कारखान्याची सत्ता भोसले गटाकडून दुसरीकडे जावी म्हणून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सर्व विरोधक एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले. मात्र हे प्रयत्न यशस्वी ठरले नाहीत. त्यामुळे ही निवडणूक तिरंगी झाली. माजी चेअरमन अविनाश मोहिते यांचे संस्थापक पॅनेल आणि राज्यमंत्री विश्वजित कदम नेतृत्व करत असलेले रयत पॅनेल अशी आणखी दोन पॅनल रिंगणात आल्याने या निवडणुकीची चर्चा झाली.
निफाडमधील दुर्मिळ घटना, एकाच पिंजऱ्यात दोन बिबटे जेरबंदhttps://t.co/m9tX0uL0JL #Nashik #Leopards
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 12, 2021
(Satara Karad Yashwantrao Mohite Krishna sugar mill Suresh Bhosale has been selected as a president)
संबंधित बातम्या :
कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीची मतमोजणी सुरु, 4 वाजेपर्यंत निकाल, कुणाच्या अंगावर गुलाल?