नवी दिल्ली : भाजपमधून काँग्रेसमध्ये गेलेल्या माजी खासदार सावित्रीबाई फुले यांनी वर्षभराच्या आतच काँग्रेसचाही ‘हात’ सोडला. फुले आता स्वतःचा पक्ष स्थापन करण्याच्या तयारीत आहेत (Former BJP MP resigns Congress).
सावित्रीबाई फुले यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसचा राजीनामा दिला. सावित्रीबाई फुले यांनी भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकून जेमतेम वर्ष झालं. त्यानंतर लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
काँग्रेसमध्ये आपला आवाज दाबला जात असल्याचा आरोप करत सावित्रीबाई फुले यांनी या पक्षालाही सोडचिठ्ठी दिली. आता आपण स्वत:चा पक्ष स्थापन करणार असल्याचं फुले यांनी जाहीर केलं.
बहराइचच्या माजी खासदार असलेल्या सावित्रीबाई फुले यांनी 6 डिसेंबर 2018 रोजी लखनौमध्ये भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. मात्र त्यांनी आपला कार्यकाळ पूर्ण केला होता.
Former BJP MP Savitri Bai Phule who joined Congress earlier this year, has resigned from the party, says ‘my voice is not being heard in Congress,hence I am resigning. I will form my own party’ pic.twitter.com/hJYiefyt1H
— ANI (@ANI) December 26, 2019
सावित्रीबाई फुले यांनी 2012 मध्ये भाजपच्या तिकिटावर बलहा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती. 2014 मध्ये त्यांना खासदारकीचं तिकीट देण्यात आलं. निवडणूक जिंकत फुलेंनी संसदेत पाऊल ठेवलं होतं. भाजपचा अनुसूचित जातीवर्गाचा महिला चेहरा म्हणून त्यांना ओळख मिळाली होती.
हेही वाचा : संभाजी भिडेंची जीभ घसरली, अपत्यहीन स्त्रियांना हिणवणारं वक्तव्य
सावित्रीबाई फुले यांचं वयाच्या सहाव्या वर्षीच लग्न झालं होतं, मात्र त्यांची पाठवणी झाली नाही. सज्ञान झाल्यानंतर सावित्रीबाईंनी संन्यास घेण्याची घोषणा केली (Former BJP MP resigns Congress) होती.