मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly election 2019) पार्श्वभूमीवर काँग्रेसची पहिली उमेदवार यादी (Congress Candidate List) आज जाहीर होण्याची शक्यता आहे. या यादीत (Congress Candidate List) बहुतांश विद्यमान आमदारांना पुन्हा संधी मिळण्याची चिन्हे आहेत. आज 50 जणांची नावं जाहीर होण्याची शक्यता आहे. पहिल्या यादीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, रमेश बागवे, प्रणिती शिंदे यांची नावं जवळपास निश्चित मानली जात आहे.
‘सीटिंग गेटिंग’ या तत्त्वानुसार सर्व आमदारांना काँग्रेस तिकीट देणार आहे. आज पहिली तर 26 तारखेला काँग्रेसची दुसरी यादी येईल, असं काँग्रेसच्या छाननी समितीचे सदस्य आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली असून, दोन्ही पक्ष 125-125 जागा लढवणार आहेत. तर मित्रपक्षांना 38 जागा सोडण्यात येणार आहेत. काँग्रेसच्या सीटिंग गेटिंग तत्वानुसार विद्यमान आमदारांना तिकीट मिळणार हे निश्चित आहे. 2014 मध्ये काँग्रेसचे 42 आमदार निवडून आले होते. मात्र त्यापैकी अनेकांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजप-शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांच्या जागी कोणत्या नव्या चेहऱ्यांना संधी मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. विशेषत: राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविरोधात काँग्रेस कुणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
काँग्रेसची संभाव्य यादी
संबंधित बातम्या
Congress MLA List 2014 | महाराष्ट्रातील काँग्रेस आमदारांची संपूर्ण यादी
महाराष्ट्रातील सर्व 288 आमदारांची यादी, महाराष्ट्रातील सर्व विधानसभा मतदारसंघ
SHIVSENA MLA List 2014 | महाराष्ट्रातील शिवसेना आमदारांची यादी 2014