मुंबई : राज्यात मागच्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील सत्ताधारी शिवसेना (Shivsena) आणि मनसे (MNS) या दोन्ही प्रादेशिक पक्षांमध्ये वार-पलटवार सुरु आहे. यापूर्वी आपण या दोन्ही पक्षांमध्ये हिंदुत्वावरुन टीका टिप्पणी, आरोप-प्रत्यारोप पाहिले असतील. आता मात्र, मनसेच्या मशिदीसमोर हनुमान चालीसा पठणाच्या नव्या मुद्द्यावरुन हा संघर्ष शिगेला पोहचलाय. यावरुन मनसे शिवसेनेला टार्गेट करण्यासाठी मागच्या काही दिवसांपासून बॅनरबाजी देखील करत आहे. तर प्रत्युत्तरादाखल शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) पत्रकार परिषद घेऊन मनसेवर पलटवार करतायेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीका केल्यानंतर मनसे विरुद्ध शिवसेना हा वाद अधिक चिघळल्याचं दिसतंय. शिवसेना भवनसमोर नव्हे तर शिवसेना नेते संजय राऊतांना टार्गेट करण्याचा प्रयत्न मनसेचा असल्याचं दितंय. दैनिक सामनाच्या कार्यालयाबाहेर यावेळेस पोस्टरबाजी करण्यात आली आहे. तर आज हनुमान जयंतीमुळे दादरमध्ये शिवसेना आणि मनसेची हनुमान मंदिरात महाआरती असल्याने शिवसेना भवनसमोरली बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
शिवसेना आणि मनसे या दोन्ही प्रादेशिक पक्षातील संघर्ष काही नवा नाही. या न त्या कारणावरुन दोन्ही पक्षातील नेतेमंडळी सतत आरोप प्रत्यारोप करत असतात. मनसेनं मागच्या काही दिवसांपासून शिवसेनेविरोधात बॅनरबाजी करायला सुरुवात केली आहे. आज सामना कार्यालयाबाहेर मनसेकडून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या विरोधात पोस्टरबाजी करण्यात आली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे हे महाराष्ट्राचे ओवेसी आहेत, अशा पद्धतीचा विधान केल्यानंतर आता मनसे कडून पोस्टरबाजी करत ओवेसी कोणाला बोलता संजय राऊत? तुमचा कर्कश भोंगा बंद करा? तुम्ही मजिदी मधील मौलाना आहात का अशा पद्धतीचा इशारा देत मनसेनं ही पोस्टरबाजी केली आहे. संजय राऊत मनसेच्या स्थापनेवेळी राज ठाकरे यांची समजूत घालण्यासाठी कृष्णकुंजवर आले होते. त्यावेळी आक्रमक मनसैनिकांकडून संजय राऊत यांची गाडी पलटी करण्यात आली होती. याचा फोटो ही या बॅनरवर लावण्यात आला आहे. या घटनेची पुनरावृत्ती व्हावी का? असा इशारा देखील मनसैनिकांनी या पोस्टरबाजीमध्ये दिला आहे. माहीम विधानसभा मतदार संघातील लक्ष्मण पाटील, उमेश गावडे, नितीन लाड या मनसेच्या कार्यकर्त्यांनी ही पोस्टरबाजी केली.
Mumbai:Poster that reads “Whom did you call Owaisi? Sanjay Raut shut down your loudspeaker,whole Maharashtra facing problem due to it or else we’ll shut down your loudspeaker in MNS style” seen outside Saamana Office
Raut reportedly called Raj Thackeray ‘Maharashtra ka Owaisi’ pic.twitter.com/qMurBPmC0Y
— ANI (@ANI) April 16, 2022
मनसेकडून आता थेट शिवसेना नेत संजय राऊतांना टार्गेट केलं जातंय. त्यामुळे हा वाद आता शिवसेना विरुद्ध मनसे नसून मनसे विरुद्ध शिवसेना नेते संजय राऊत, असा झाल्याचं दिसून येतंय. सामना कार्यालयाबाहेर मनसेकडून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या विरोधात पोस्टरबाजी करण्यात आली आहे. संजय राऊत मनसेच्या स्थापनेवेळी राज ठाकरे यांची समजूत घालण्यासाठी कृष्णकुंजवर आले होते. त्यावेळी आक्रमक मनसैनिकांकडून संजय राऊत यांची गाडी पलटी करण्यात आली होती. याचा फोटो ही या बॅनरवर लावण्यात आला आहे. या घटनेची पुनरावृत्ती व्हावी का? असा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे.
इतर बातम्या
Skin Care : त्वचेवर नैसर्गिक चमक हवी आहे? मग आजच आपल्या आहारामध्ये या पदार्थांचा समावेश करा!
KKR vs SRH IPL 2022: नितीश राणाचा षटकार, डगआउटमधल्या फ्रीजची काच फुटली