नाशिक : कँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित (Manikrao Gavit) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांचं निधन झालं. त्यांच्यावर नाशिकमध्ये (Nashik) उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालावली. त्यांच्यावर रविवारी नवापूरमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांनी काँग्रेस (Congress) सरकारच्या काळात अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत आपल्या कार्याचा एक वेगळा ठसा उमटवला. त्यांनी प्रदीर्घ काळ आदिवासी समाजाचे नेतृत्व केले. त्यांच्या जाण्याने आदिवासी समाजाचं नेतृत्व हरपल्याची भावना आहे. त्यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. माणिकराव गावित यांच्या पश्चात तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. माणिकराव गावित हे काँग्रेसकडून अनेकदा लोकसभेवर निवडून आले होते. गावित यांच्या निधनाने काँग्रेसचा मार्गदर्शक नेता हरपला आहे.