ठाणे : (Eknath Shinde) शिंदे सरकारची स्थापना झाल्यानंतर देखील (Shiv sena Party) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भाजपाने बंद दाराआड मुख्यमंत्री पदाबाबत शब्द दिला होता का याचा सस्पेंन्स कायम आहे. याबाबत आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच स्पष्टीकरण दिले आहे. मुख्यमंत्री पदाबाबत असा कोणताही शब्द (Amit Shah) अमित शाह यांनी दिला नसल्याचे मुख्यमंत्री यांनी ठाण्यातील एका कार्यक्रमात सांगितले आहे. ज्या मुद्यावरुन भाजप आणि शिवसेनेची युती संपुष्टात आली त्यावरच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे नेमके कोण खोटे आणि कोण खरे हा प्रश्न अनउत्तरीच आहे. शिवाय बिहारमध्ये कमी संख्याबळ असताना देखील नितीशकुमार यांना मुख्यमंत्री पद दिले गेले होते की असा निर्वाळाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.
ठाण्यातील कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, जर आम्ही बिहारमध्ये नितीशकुमार यांचे आमदार कमी असताना त्यांना मुख्यमंत्री बनवू शकतो शिवाय तुमचे 50 आणि भाजपाचे 106 असताना आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करु शकतो तर आम्ही शब्द दिला असता का फिरवला असता असे स्पष्टीकरण गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. त्यामुळे अमित शाह यांनी असा कोणताच शब्द ठाकरे यांना दिला नसल्याचे स्पष्ट होते असाच शिंदे यांच्या वक्तव्याचा अर्थ होता. त्यामुळे जो आरोप शिवसेनेकडून सातत्याने केला जातो तो खोडून काढण्याचा प्रयत्न आता एकनाथ शिंदे यांनीच केला आहे.
अडीच वर्ष शिवसेनेचा आणि त्यानंतर भाजपचा मुख्यमंत्री असा फॉर्म्युला ठरल्याचे उद्धव ठाकरे हे सातत्याने सांगत आहेत पण मी या सर्व घटनेचा साक्षीदार राहिलेलो आहे. त्यामुळे असा कोणताच फॉर्म्युला ठरला नव्हता असे म्हणत मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याला त्यांनी दुजोरा दिला आहे.आकड्यांचा खेळ करता येतो हे लक्षात आल्यानंतर त्यांनी ही भूमिका घेतल्याचे फडणवीसांनी सांगितले आहे. सत्ता स्थापनेस मित्र पक्षाची गरज लागतेच हे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी भूमिका बदलण्यास सुरवात केल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे.
आमच्यासोबत निवडुण आले आणि विरोधकांशी हात मिळवणी करीत सत्तेत बसले मग विश्वासघातकी कोण असा सवालच देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे. त्यामुळे बेईमानी आम्ही केली नाहीतर आमच्यासोबतच झाल्याचे त्यांनी सांगितले आहे.