सांगोला : एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांचं बंड झाल्यापासून राज्याच्या राजकारणात एक शब्द रोज ऐकायला मिळतोय तो म्हणजे “गद्दार”, कधी आदित्य ठाकरे बंडखोरांना गद्दार म्हणतात. तर कधी उद्धव ठाकरे बंडखोरांना विश्वासघातकी म्हणतात. मात्र आता आमदारांना गद्दार म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंविरोधात आता गुवाहाटी फेम, काय झाडी… काय डोंगार… काय हाटील… (Kay Zadi Kay Dongar Kay Hotel) डायलॉगनं गाजलेले सांगोला तालुक्याचे आमदार शहाजी बापू पाटील (Shahajibapu Patil) हे चांगलेच खवळले आहेत. आता आम्ही तुम्हाला गद्दार वाटतोय, मग अडीच वर्षांपूर्वी आम्हाला तिकीट देताना तुमची बुद्धी गहाण ठेवली होती का? असा थेट सवाल त्यांनी आदित्य ठाकरे यांना केलाय. सुरुवातीला ठाकरेंबाबत मवाळ भूमिका घेणारे हे आमदार त्यांना रोज रोज गद्दार म्हणाल्यामुळे आता खवळून उठताना दिसत आहेत.
तसेच ही गद्दारी नाही ही खुद्दारी आहे. 50 आमदार जर आज आदित्य ठाकरे यांना गद्दार वाटत असतील तर अडीच वर्षांपूर्वी आम्हाला तिकीट देताना तुमची बुद्धी घाण पडली होती का? तुम्हाला तेवढी बुद्धी नव्हती का? की हे गद्दार आहे त्यांना तिकीट कशी द्यायचीय़ असा सवाल शहाजी बापू पाटलांनी आदित्य ठाकरेंना केलाय. तसेच आम्ही निष्ठावान होतो. बाळासाहेब ठाकरेंचा विचार घेऊन पुढे जाणारा होतो. आम्ही हाडाचे शिवसैनिक होतो. उद्धव साहेबांचं नेतृत्व मानूनच आम्ही निवडणुका लढवल्या. मात्र अडीच वर्षात जे काही घडलं ते बघायलाच तुम्ही तयार नसाल तर पुढच्या दोन वर्षात नेमकं काय करायचं आणि निवडणुकीला कसं सामोरे जायचं? हा प्रत्येकाच्या समोर प्रश्न होता, असेही बापू म्हणाले आहेत.
तर राष्ट्रवादीचा अर्जंट होता राष्ट्रवादीचा अजेंडा होता सव्वाशे आमदार निवडून आणायचा, काँग्रेस म्हणत होती शंभर आमदार निवडून आणणार आणि आमचे सगळे गप्प बसले होते. तेव्हा भीतीग्रस्त भावनेने आणि संकटाने, दुःखाने केलेला हा निर्णय आहे. सर्व आमदारांनी केलेला हा जबरदस्त उठाव आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले. आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना याचा नेतृत्व करण्याला भाग पाडलेलं आहे. त्यांनी समर्थ नेतृत्व केलं. आज ते मुख्यमंत्री झालेले आहेत. राज्याचे अनेक निर्णय गेल्या तीन आठवडे त्यांनी चांगल्या पद्धतीने घेतलेले आहेत आणि अडीच वर्षाचा कारभार त्यांचा दैदिप्यमान होईल, असा मला विश्वास आहे. असेही शहाजी बापू पाटील म्हणाले आहेत.