कोल्हापूर: गृह राज्यमंत्री आणि शिवसेना नेते शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी सेनेवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस हे विरोध पक्षात आहेत. विधान परिषद निवडणुकीत त्यांच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आमच्या पक्षावर टीका करण्याशिवाय पर्याय नाही, असं देसाई म्हणाले. आमच्यावर कितीही टीका झाल्या तरी शिवसेना ही आपल्या विचारांवर ठाम आहे. केवळ महाविकास आघाडीमध्ये मतभेद निर्माण करण्यासाठी देवेंद्र फडणवीस अशा प्रकारची वक्तव्य करत आहेत, असं शंभूराज देसाई म्हणाले. (Shambhuraj Desai gave answer and criticized Devendra Fadnavis )
राज्य सरकार महिलांवरील वाढत्या अत्याचारांबाबत गंभीर आहे. महिला सुरक्षेसाठी आंध्र प्रदेशच्या धर्तीवर दिशा कायदा करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. दिशा कायद्याचं प्रारूप मंजुरीसाठी लवकरच मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी ठेवू, अशी माहिती शंभूराज देसाईंनी दिली. (Shambhuraj Desai gave answer and criticized Devendra Fadnavis )
राज्य सरकारने विधान परिषदेच्या 12 जागांसाठी राज्यपालांकडे पाठवलेल्या यादीवर आक्षेप घेतल्याची माहिती राजभवनाच्या सूत्रांकडून अद्याप मिळालेली नाही. राज्यघटनेने दिलेल्या अधिकारानुसार बारा मान्यवरांची शिफारस मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर राज्यपालांच्या कडे करण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाने पाठवलेल्या बारा जणांच्या नावांवर राज्यपाल सकारात्मक निर्णय घेतील, अशी आशा शंभूराज देसाईंनी व्यक्त केली. (Shambhuraj Desai gave answer and criticized Devendra Fadnavis )
महाविकास आघाडीमध्ये एकमेकांमध्ये पूर्ण समन्वय आहे. निधी वाटपाबाबत कसलीही नाराजी नाही. काही विभागांना अधिक निधी मिळावा अशी अपेक्षा असणं चुकीचं नाही, असं मत देसाई यांनी व्यक्त केले.
राज्यातील शाळेतील शिक्षकांची चाचणी केली असता कोरोना पॉझिटिव्हचे प्रमाण वाढले ही वस्तुस्थिती आहे. मात्र, शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घ्यायचा आहे, अशी माहिती त्यांनी दिली. कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी राज्य सरकार सज्ज आहे, असं देखील शंभूराज देसाई म्हणाले.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शुक्रवारी (6 नोव्हेंबर) संध्याकाळी राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या नावाची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सादर केली होती. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब केल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ही यादी राज्यपालांकडे सुपूर्द केली होती. त्यानंतर पंधरा दिवस उलटून गेले तरीही राज्यपालांनी अद्याप यादीतील नावे जाहीर केलेली नाहीत.
12 सदस्यांमध्ये कोणाची नावं?
काँग्रेस
1) सचिन सावंत – सहकार आणि समाजसेवा
2) रजनी पाटील – सहकार आणि समाजसेवा
3) मुजफ्फर हुसैन – समाजसेवा
4) अनिरुद्ध वनकर – कला
राष्ट्रवादी काँग्रेस
1) एकनाथ खडसे – सहकार आणि समाजसेवा
2) राजू शेट्टी – सहकार आणि समाजसेवा
3) यशपाल भिंगे – साहित्य
4) आनंद शिंदे – कला
VIDEO | Kishori Pednekar | मुंबईत येणाऱ्या एक्सप्रेस रद्द करा, महापौर
किशोरी पेडणेकरांची मागणीhttps://t.co/0uD3Qy1uOA#mumbai #corona #CoronaVirusUpdates— TV9 Marathi (@TV9Marathi) November 22, 2020
संबंधित बातम्या :
Shambhuraj Desai | गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांची कुटुंबियासोबत दिवाळी साजरी
Sushant Singh Rajput | बिहार पोलिसांनी तपासात लक्ष घालणं अयोग्य : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई
(Shambhuraj Desai gave answer and criticized Devendra Fadnavis )