गांधीनगर : गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री शंकरसिंह वाघेला यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहित राष्ट्रवादीचे राष्ट्रीय महासचिव शंकरसिंह वाघेला यांनी प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. (Shankersinh Vaghela tenders his resignation from the post of national general secretary of Nationalist Congress Party)
शंकरसिंह वाघेला यांनी 2019 च्या निवडणुकांवेळी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यावेळी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांच्यासह अहमदाबादहून मुंबईत येत वाघेला यांनी हाती ‘घड्याळ’ बांधलं होतं. परंतु राष्ट्रवादीच्या गुजरात प्रदेशाध्यक्षपदावरुन उचलबांगडी केल्याने शंकरसिंह वाघेला नाराज होते. अखेर शरद पवारांना पत्र लिहित वाघेलांनी राजीनामा दिला.
79 वर्षीय शंकरसिंह वाघेला हे 1970 ते 1996 अशी तब्बल भाजप 26 वर्षे भाजपमध्ये होते. तर 1998 ते 2017 ही 19 वर्षे त्यांनी काँग्रेसमध्ये घालवली. त्यांनी राजकीय कारकिर्दीत पाचव्यांदा एखाद्या पक्षाचा राजीनामा दिला आहे.
1996 मध्ये भाजपमधून फुटून त्यांनी राष्ट्रीय जनता पक्षाची स्थापना केली. 1996-1997 या एका वर्षासाठी ते राष्ट्रीय जनता पक्षाकडून गुजरातचे मुख्यमंत्री झाले होते. नंतर त्यांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विसर्जित केला. काँग्रेसमध्ये असताना गुजरातचे विरोधीपक्ष नेते पद आणि केंद्रीय मंत्रिपदही त्यांनी भूषवले आहे.
Shankersinh Vaghela tenders his resignation from the post of national general secretary of Nationalist Congress Party (NCP) as well as active membership of the party. pic.twitter.com/9hWt0XBq77
— ANI (@ANI) June 22, 2020
शंकरसिंह वाघेला यांच्या पक्षांतराचा इतिहास
1970-1996 – भाजप
1996-1998 – राष्ट्रीय जनता पक्ष
1998-2017 – काँग्रेस
2017-2019 – जन विकल्प मोर्चा
2019-2020 – राष्ट्रवादी
(Shankersinh Vaghela tenders his resignation from the post of national general secretary of Nationalist Congress Party)