सोलापूर : शिंदे गटाचं (Eknath Shinde) हिंदुत्व लोकांना आणि गुवाहाटीच्या कामाख्या देवीलाही मान्य नाही. त्यामुळे गुवाहाटीवरून परतताच शिंदे-फडणवीस सरकार पडणार, असा दावा शिवसेना ठाकरेगटाचे नेते, युवासेना राज्य विस्तारक शरद कोळी (Sharad Koli) यांनी केला आहे. याचसोबत त्यांनी आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावरही जोरदार टीका केली आहे.
एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर आधी सूरतमार्गे शिंदेगटाचे सगळे आमदार गुवाहाटीला गेले. तिथे एकनाथ शिंदेंनी सर्व आमदारांसह कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. त्यानंतर गोवा मार्गे सगळे आमदार विधीमंडळात दाखल झाले आणि शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आलं. त्यानंतर आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदे मंत्री आणि आमदारांसह गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनासाठी जात आहेत. शिंदेंचं कुटुंबही यावेळी त्यांच्यासोबत आहे. यावर ठाकरेगटाच्या वतीने टीका करण्यात आली आहे.
शरद कोळी यांनी शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटलांवर सडकून टीका आहे. शहाजी बापूंचं तोंड गटारीसारखे आहे. त्यामुळे ते संजय राऊतांवर टीका करत असतात. शाहजीबांपूनी बुडाखालचा अंधार बघावा आणि मग इतरांना बोलावं, असं कोळी म्हणालेत.
हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिंदेंनी भाजपसोबत सरकार स्थापन केलं. मात्र तेच हिंदुत्व आज तुम्ही खुंटीला टांगलं आहे, असं शरद कोळी म्हणालेत.
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द बोलणाऱ्या कोशारींची तुम्ही पाठराखण तुम्ही कशी काय करता?
महाराजांची बदनामी होत असताना तुमचे हिंदुत्व कुठे जातं? तुमचं हिंदुत्व गुवाहाटीला मान्य होणार नाही. गुवाहाटी वरून परत आल्यानंतर शिंदे भाजप सरकार पडल्याशिवाय राहणार नाही, असं शरद कोळी म्हणालेत.