मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची अहमदाबादेत गुप्त भेट झाल्याचं वृत्त आहे. त्यामुळे राज्यासह देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अशाप्रकारची भेट झाली नसल्याचं सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे सगळ्या भेटी सार्वजनिक करायच्या नसतात असं म्हणत अमित शाह यांनी खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारबाबत अनेक चर्चा आता सुरु झाल्या आहेत. असं असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेस ठाकरे सरकारमधून सध्या तरी बाहेर पडू शकत नसल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे.(NCP will not leave the Mahavikas Aghadi government at present, read 3 reasons)
शरद पवार यांचे सर्वच राजकीय पक्षांशी आणि पक्षांच्या नेत्यांची चांगले संबंध आहे. पंतप्रधान मोदी यांनी बारामतीत येऊन शरद पवार हे आपले राजकीय गुरु असल्याचं म्हटलं होतं. दुसरीकडे ते बंगालमध्ये काँग्रेसचा विरोध डावलून ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचा प्रचार करण्यासाठी जात आहेत. शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावर त्यांनी डावे आणि अन्य पक्षांच्या नेत्यांसह राष्ट्रपतींची भेट घेतली होती. तर दक्षिणेत ते काँग्रेसचा विरोधक असलेल्या डाव्यांसोबत आहेत. त्यामुळे शरद पवार यांचे सर्वच पक्षांशी चांगले संबंध आहेत, असं ज्येष्ठ पत्रकार संजय आवडे यांनी सांगितलं.
दुसरीकडे अमित शाह आणि शरद पवार यांची भेट झाली असं जरी मानलं, तरी राष्ट्रवादी काँग्रेस आताच ठाकरे सरकारमधून बाहेर पडण्याची शक्यता नसल्याचंही आवटे म्हणाले. त्यासाठी त्यांनी काही कारणंही दिली आहे. त्यात शरद पवारांची विश्वासार्हता, त्यांची प्रतिमा आणि आता सत्तेबाहेर पडणं परवडणारं नसल्याचं त्यांनी म्हटलंय.
शरद पवार जे बोलतात त्याच्या नेमकं उलटं करतात, असं महाराष्ट्रात बोललं जातं. तसंच त्यांच्या विश्वासार्हतेवरही अनेकदा प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातं. पण 2019च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पुढाकार घेत महाविकास आघाडी सरकारची उभारणी केली आहे. तसंच पवार राज्यात आता भाजप विरोधात अनेक पावलं पुढे आले आहेत. अशावेळी महाविकास आघाडीबाहेर पडून पुन्हा एकदा आपल्या विश्वासार्हतेवर पवार प्रश्न निर्माण करणं पवारांना परवडणारं नसल्याचं आवटे म्हणाले.
शरद पवार यांची प्रतिमा कायम अविश्वासार्ह अशी होती. पण गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर ती विश्वासार्ह अशी बनली आहे. महाविकास आघाडीच्या उभारणीनंतर तर पवारांची प्रतिमा महाराष्ट्रात खूप वेगली बनली आहे. त्यामुळे पवार पुन्हा एकदा आपल्या प्रतिमेला तडा जाऊ देतील, असं वाटत नसल्याचंही त्यांनी म्हटलंय.
सध्या महाविकास आघाडीतून किंवा सत्तेतून बाहेर पडणं कुणालाही परवडणारं नाही. महाराष्ट्रातील नागरिकांचं नजरा सरकारकडे आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडेही आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्वकाही आलबेल आहे असंही नाही. यापूर्वी भाजप शिवसेनेच्या काळात किंवा काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळातही सर्वकाही आलबेल होतं असं नाही. पण सध्याच्या काळात महाविकास आघाडी सरकारमधून कोणत्याही पक्षाला बाहेर पडणं परवडणारं नाही. तसंच शरद पवार यांची सत्तेबाहेर पडून भाजपसोबत जाण्याची मानसिकताही वाटत नसल्याचं आवटे यांनी म्हटलंय.
संबंधित बातम्या :
VIDEO | सब चीजे सार्वजनिक नहीं होती, पवारांशी गुप्त भेटीच्या चर्चांवर अमित शाहांचं सूचक वक्तव्य
NCP will not leave the Mahavikas Aghadi government at present, read 3 reasons