अकोला : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडक यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार टीकास्त्र (Prakash Ambedkar on Sharad Pawar) सोडले आहे. शरद पवार आणि अशोक चव्हाण हे शेतकऱ्यांचे नेते (Leader of Farmer) नाहीत, तर ते कारखानदारांचे मालक (Owner of Sugar Factory) असल्याचं मत प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केलं. तसेच शेतकऱ्यांच्या मालाची लूट कशी होईल, हेच ते पाहतात, असा आरोपही केला. भारतीय बौद्ध महासभा अकोला जिल्हा शाखेने 63 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त धम्ममेळाव्याचं आयोजन केलं होतं. यावेळी ते बोलत होते. यावेळी हजारो अनुयायी सोहळ्याला उपस्थितीत होते.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, “शरद पवार आणि अशोक चव्हाण हे शेतकऱ्यांचे नेते नाहीत, तर ते कारखानदारांचे मालक आहेत. त्यांना शेतकऱ्याचं काहीही पडलेलं नाही. ते फक्त शेतकऱ्यांच्या मालाची लूट कशी करता येईल, हेच पाहतात.”
यावेळी आंबेडकरांनी उपस्थितांना या निवडणुकीत योग्य निर्णय घेण्याचंही आवाहन केलं. ते म्हणाले, “आता तुम्हीच ठरवा तुम्हाला काय करायचं आहे ते? घोड्याला पाण्यापर्यंत नेता येतं. पाणी पाजता येत नाही. लुटणाऱ्या नेत्यांना ओळखा आणि निवडणुकीत योग्य निर्णय घ्या.”