उदगीर : “ईडी की फिडी मला कोणी काही करत नाही. सगळ्यांचे फोन आले की असं करु नका. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितले की ईडीकडे जाऊ नका” असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी (Sharad pawar udgir rally) केला. लातूरमधील उदगीरच्या सभेत शरद पवार बोलत (Sharad pawar udgir rally) होते.
ईडी का फिडी मला कोणी काही करत नाही. मला सगळ्यांचे फोन आले, असं करु नका. तिकडे जाऊन नका असे अनेकजण सांगत होते. मी म्हणालो जाऊन येतो. पण त्यानंतर स्वत: मुख्यमंत्र्यांनी सांगितलं जाऊ नका. तसेच पोलिसांनी ही सांगितलं तुम्ही पण मुख्यमंत्री होता, तेव्हा असं करु नका असेही शरद पवार यावेळी म्हणाले.
तसेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत बोलताना शरद पवारांनी सरकारवर निशाणा साधला. “मोठ्या लोकांचे 70 हजार कोटींचे कर्ज माफ झाले. शेतकऱ्यांचे काय? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. बँका वाचल्या पाहिजेत म्हणून यांनी ही कर्जमाफ केल्याचे सांगतात. पण मग शेतकरी वाचला अस वाटतं नाही का? असेही ते यावेळी म्हणाले.”
शरद पवारांनी काय केलं असं जो तो माझ्या नावानं ओरडत फिरतोय. यांना माझ्याशिवाय दुसरं काहीचं दिसत नाही असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.
“छत्रपतींच्या नावानं मत मागणाऱ्यांनी स्मारकाची एक वीटही रचली नाही. उलट छत्रपतींच्या किल्यावर छमछम सुरु करत आहेत. अरे छमछम करायची तर सोलापूरच्या मोडनिंबला जा. चांगली छमछम आहे.” तिथे असेही ते यावेळी म्हणाले.
“शिवाजी महाराजांच्या नावाचे राजकारण करून हे सत्तेत आले. सत्तेत आल्यावर अरबी समुद्रात भव्य शिवस्मारक बांधण्याचे आश्वासन खोटं ठरलं. महाराजांची परंपरा जपणारे गडकिल्लेही पर्यटनासाठी खुले केले. हीच किल्ल्यांची प्रतिष्ठा तुम्ही करता?” असा प्रश्नही शरद पवारांनी उपस्थित केला.