पुणे : 2014 ते 2019 अशी पाच वर्षे मुख्यमंत्रीपदाची धुरा समर्थपणे सांभाळणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अनपेक्षितपणे मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा केली आणि आपण सत्तेत बाहेर असू, पण सरकार चालावे ही आपली जबाबदारी असल्याचं सांगितलं होतं. मात्र, भाजपच्या केंद्रीय स्तरावर मोठी हालचाल झाली आणि अवघ्या काही वेळात देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री (Deputy CM) व्हावं असा आदेश देण्यात आला. पक्षादेश शिरोधार्य मानत फडणवीस यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. महत्वाची बाब म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनाही हा आश्चर्याचा धक्का होता. पत्रकारांशी बोलताना खुद्द पवार यांनीच त्याबाबत प्रतिक्रिया दिली.
एक गेले काही दिवस आसाम राज्यात आपल्या राज्यातील 39 विधानसभेचे सदस्य गेले होते. त्यात जी मागणी असावी ती मागणी एक तर राज्याच्या नेतृत्व बदलाची. त्यानंतर कुणाला तरी त्या पदावर काम करण्याची संधी मिळावी. पण जे आसाममध्ये सहकारी गेले. त्यांच्या अपेक्षा उपमुख्यमंत्र्यापेक्षा अधिक होत्या असं वाटत नाही. पण भाजपमध्ये दिल्लीचा आदेश आला किंवा नागपूरचा आदेश आला तर त्यात तडजोड नसते. त्यामुळे आदेश आला. त्याचा परिणाम मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी शिंदेंवर पडली. त्याची कल्पना कुणाला नव्हती. शिंदेंनाही कदाचित नसेल.
दुसरं आश्चर्य म्हणजे तसं आश्चर्य नाही पण पुन्हा कार्यपद्धतीत आदेश दिल्यानंतर तो आदेश तंतोतंत पाळावं लागतो. त्याचं उत्तम उदाहरण जे मुख्यमंत्री होते, पाच वर्ष काम केलं, नंतर विरोधी पक्षाचं नेतृत्व केलं, त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी लागली. हा आश्चर्याचा धक्का होता. पण एकदा पक्षानं आदेश दिला की सत्तेची कोणतीही संधी मिळाली तर ती स्वीकारायची असते. याचं उदाहरण फडणवीसांनी आज घालून दिलं आहे. या दोन्ही गोष्टी आम्हाला कुणाला माहित नव्हत्या, पण असं घडलं. तर ते अंमलात येतं आणि ते येईल. ते अंमलात येण्यासाठी कोणी नकार किंवा प्रतिक्रिया देईल असं वाटलं नव्हतं, पण ते खरं ठरलं. असं मतही शरद पवार यांनी व्यक्त केलंय.
तिसरी गोष्ट अशी एकदा मुख्यमंत्रीपदावर गेल्यानंतर त्याच यंत्रणेची पदे स्वीकारण्याची उदाहरणे महाराष्ट्रात यापूर्वी होती. माझ्या मंत्रिमंडळात. शंकरराव चव्हाण अर्थ मंत्री होते. शंकरराव चव्हाणाच्या मंत्रिमंडळात मी मंत्री होतो. पण जेव्हा मी मुख्यमंत्री झालो, तेव्हा शंकररावजी माझ्या मंत्रिमंडळात ज्वाईन झाले. शंकररावजी नंतर शिवाजीराव निलंगेकर मुख्यमंत्री होते, नंतर ते मंत्री झाले. त्यानंतर अशोकराव चव्हाण सध्याचे मंत्री. तेही मुख्यमंत्री होते, ते मंत्री झाले. त्यामुळे अशी उदाहरणं महाराष्ट्रात घडली आहे, अशी माहितीही पवार यांन यावेळी दिली.