शरद पवार यांनी वंश वाढवण्यासाठी मुलाची…, अजित पवार यांची टीका नव्हे तर…. जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Dec 02, 2023 | 10:11 PM

पिंपरी चिंचवडमधील कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे. इथे सुरू असलेले काम पाहता राष्ट्रवादी काँग्रेसला पूर्वीची दिवस नक्की येतील असे जयंत पाटील म्हणाले. अनेक जण आमच्या संपर्कात आहेत. शहराध्यक्ष तुषार कामठे हे ही संपर्कात आहेत. लवकरच त्यांचे प्रवेश होतील.

शरद पवार यांनी वंश वाढवण्यासाठी मुलाची..., अजित पवार यांची टीका नव्हे तर.... जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?
SHARAD PAWAR
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

पिंपरी चिंचवड | 2 डिसेंबर 2023 : आम्ही सर्व जण न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत. शरद पवार साहेबांसारख्या मोठ्या नेत्याच्या हातातून पक्ष काढून घेणं हे देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीने फार शहाणपणाचे ठरेल असे वाटत नाही. सध्या आमच्या वकिलांनी जे फॅक्टस मांडलेले आहेत हे पाहता शरद पवार यांनी हा पक्ष स्थापित केला हे स्पष्ट आहे. हे पाहता त्यांच्या हयातीत तरी त्यांचा पक्ष निवडणूक आयोग काढून घेणार नाही, असे मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

पक्षपात होण्याआधी निर्णय घेण्याबाबत आरोप करणं योग्य नाही. आमदार एकीकडे गेले म्हणून पक्ष फरपटत जातो हे योग्य नाही असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. त्यामुळे न्यायालय वेगळा काही निर्णय घेईल असं वाटत नाही. तसेच, 16 अपात्र आमदार प्रकरणी सुप्रीम कोर्टाने 31 डिसेंबरची शेवटची मुदत दिली आहे. पहिल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने काय केलं याचा आढावा होईल. त्यामुळं लवकरच याचा निर्णय होईल असे वाटत असल्याचेही ते म्हणाले.

शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पिंपरी चिंचवडमध्ये मोर्चेबांधणी सुरू आहे. शनिवारी जाहीर सभेद्वारे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पिंपरी चिंचवडमधील नवीन कार्यकारिणी जाहीर केली. तत्पूर्वी जयंत पाटील यांच्या हस्ते पक्षाच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन झाले. अजित पवार यांच्या एकेकाळच्या बालेकिल्ल्यात शरद पवार गट यानिमित्ताने शक्तिप्रदर्शन करत आहे. यावेळी प्रसार माध्यमांसोबत ते बोलत होते.

हे सुद्धा वाचा

राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे यांच्या वाहनांची काही जणांनी तोडफोड केली. मात्र, राजेश टोपे यांच्याशी माझा संपर्क झाला नाही. अधिक माहिती घेऊन त्यावर बोलेन. अजित पवार यांनी पक्षाच्या शिबिरात काही आरोप केले. त्यावर अनिल देशमुख यांनी त्यावेळी काय घडलं हे स्वतः सांगितलं आहे. मुश्रीफ साहेब कसे येऊन बसले होते. हा सर्व इतिहास सर्वांसमोर आहे. त्यामुळे सुज्ञास अधिक सांगायला लागू नये असा टोला त्यांनी लगावला.

अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर जी काही टीका केली त्याकडे टीका म्हणून पाहू नका. शरद पवार साहेबांनी त्या उत्तर दिलं आहे. त्या दोघांमधील संवादामध्ये एकाने भाष्य केले. दुसऱ्याने खुलासा केला. त्यामुळे तिसऱ्याने त्यावर भाष्य करणं योग्य नाही. पवार साहेबांनी अतंत्य समर्पक शब्दांत खुलासा केला आहे. अजित पवार याचं पूर्ण भाषण मी ऐकलेलं नाही. मात्र, ही टीका आहे की कौतुक आहे? तुम्ही ही टीका म्हणून का घेता? ज्यांनी वंश वाढवण्यासाठी मुलाची वाट पाहिली नाही असे शरद पवार हे देशासमोर आदर्श आहेत. त्यामुळे अजित पवारांनी ती टीका नव्हे तर कौतुक केलं आहे. तुम्ही त्याकडे टीका म्हणून पाहू नये, असा टोला त्यांनी अजित पवार यांना लगावला.