अहमदनगर : “शरद पवारांच्या नेतृत्वाखाली जे काही सरकार स्थापन होईल. ते पाच वर्षे टिकेल, असा विश्वास नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांनी व्यक्त (Rohit pawar on Maharashtra government formation) केला. यात कोणतेही वाद होणार नाही,” असेही ते म्हणाले. अहमदनगरला कर्जत येथे मतदारसंघाची पाहणी करत असताना त्यांनी ही प्रतिक्रिया (Rohit pawar on Maharashtra government formation) दिली.
“गेल्या पाच वर्षात विकास भरकटला आहे. त्यामुळे लवकरच महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळावं,” अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. “तिन्ही पक्षांमध्ये कोणाला कोणतं खातं मिळणार हे वरिष्ठ नेते सत्ता आल्यानंतर ठरवतील. त्याबद्दल मी काहीही बोलणार नाही” असेही रोहित पवार म्हणाले.
“एक सकारात्मक भूमिका म्हणून आम्ही आमदार पाहत आहे. मात्र या तिन्ही पक्षांना एक किमान समान कार्यक्रम असावा. तसेच या तिन्ही पक्षांनी निवडणुकांच्या काळात कोणते मुद्दे मांडले होते. ते सर्व मुद्दे किमान समान कार्यक्रमात घेतले जातील.” असे रोहित पवार (Rohit pawar on Maharashtra government formation) म्हणाले.
“एखाद्या विषयाबाबत विचारसरणी वेगळी असू शकते. मात्र विकासाच्या मुद्द्यावर हे सर्व एकत्र येत आहेत.” असे रोहित पवार म्हणाले. “गेल्या पाच वर्षात विकास भरकटला आहे. त्यामुळे लवकरच स्थिर सरकार पाहायला मिळेल,” असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान राष्ट्रपती राजवट असली तरी आमच्या वरिष्ठ नेत्यांनी आम्हाला लोकांमध्ये जाऊन अडीअडचणी सोडवण्यास सांगितल्या आहेत. जेणेकरुन आपल्या विचाराचे सरकार आल्यावर त्या आपल्याला सोडवता येईल, असं रोहित पवार (Rohit pawar on Maharashtra government formation) म्हणाले.
उद्या सत्तास्थापनेचा अंतिम निर्णय?
बुधवारी (20 नोव्हेंबर) काँग्रेस-राष्ट्रवादीच्या साडेपाच तासांच्या बैठकीनंतर आज पुन्हा एकदा काँग्रेस राष्ट्रवादीची बैठक झाली. या बैठकीपूर्वी दोन्ही पक्षांची स्वतंत्र आणि नंतर एकत्र बैठक झाली. दरम्यान उद्या सकाळी 11 वाजता मुंबईत काँग्रेस राष्ट्रवादीच्या घटकपक्षांची बैठक होणार आहे. यशवंतराव चव्हाण सेंटर या ठिकाणी ही बैठक होणार आहे. या बैठकीत सर्व मित्रपक्षांशी आघाडी चर्चा करणार आहे. त्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांची शिवसेना नेत्यांसोबत बैठक होईल. त्यामुळे आता मुंबईत सत्तास्थापनेच्या वाटाघाटी सुरु होणार आहेत.