मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पुन्हा एक खरमरीत पत्र लिहिलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या राज्यपाल सचिवालयातर्फे प्रकाशित करण्यात आलेलं ‘जनराज्यपाल – भगतसिंह कोश्यारी’ हे चित्ररुप कॉफी टेबल पुस्तक शरद पवार यांना पाठवले होते. त्या पुस्तकावरुन शरद पवार यांनी पुन्हा एकदा राज्यपाल कोश्यारी यांना खरमरीत शब्दात एक पत्र लिहिलं आहे. (Sharad Pawar letter to governor Bhagatsingh Koshyari on ‘coffee table’ book )
सुरुवातीला या पुस्तकाच्या शिर्षकावरुनच पवार यांनी राज्यपालांना फटकारले आहे. “वास्तविक भारतीय संविधानात ‘जनराज्यपाल’ असा उल्लेख आढळत नाही, तरीही राज्य शासनाच्यावतीने सुबक छपाई असलेले आपल्या एक वर्षाच्या मर्यादित कालावधीवर प्रकाश टाकणारे स्व प्रसिद्ध कॉफी टेबल बुक पाठवण्यात आले याबद्दल धन्यवाद”. अशा शब्दात पवार यांनी राज्यपालांच्या पत्राला खोचक उत्तर दिलं आहे.
“आपल्या मर्यादित कालावधीतील एखाद-दुसरा प्रसंग वगळता शपथविधी, स्वागत समारंभ, दीक्षांत समारंभ यांसारखे सोहळे, उच्चपदस्थ अभ्यागतांच्या – मान्यवरांच्या भेटीगाठी, इतर सामाजिक – सांस्कृतिक कार्यक्रम वर त्यातील आपल्या सहभागाची छायाचित्रे पाहण्यात आली. तसेच निधर्मवादा संदर्भात राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आपण दिलेल्या सल्ल्याची आणि त्या उपरांत केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतलेल्या दखलेची नोंद या पुस्तकात दिसून आली नाही”, असा टोलाही शरद पवार यांनी पत्राच्या माधम्यातून लगावला आहे.
‘राज्यपाल हे देशातील महत्वाच्या आणि आदरणीय पदांपैकी एक पद आहे. त्या पदाचा आदर जसा राखला जातो, तसाच मुख्यमंत्री या पदाचाही राखला गेला पाहिजे. आता केंद्रीय गृहमंत्र्यांनी कानउघाडणी केल्यानंतर राज्यपालांनी पदावर राहावं नाही हे ठरवावं’, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता. तसंच पवार यांनी राज्यपालांच्या पत्राबाबत नाराजी व्यक्त करताना थेट पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून राज्यपालांच्या पत्रातील भाषेवर आक्षेप व्यक्त केला होता. (Sharad Pawar letter to governor Bhagatsingh Koshyari on ‘coffee table’ book )
राज्यातील मंदिरे सुरु करण्याच्या मागणीसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं होतं. त्या पत्रावरुन जोरदार राजकारण रंगलेलं संपूर्ण राज्यानं पाहिलं आहे. त्या पत्रात राज्यापालांनी मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाची आठवण करुन देण्यासाठी काही प्रश्न विचारे होते. ‘राज्यात बार-रेस्टॉरंट सुरु झाले, मग देव कुलुपबंद का? तुम्हाला हिंदुत्वाचा विसर पडला आहे का?’ अशाप्रकारच्या पश्नांचा त्यात समावेश होता. त्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज्यपालांना जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची गरज नाही. तसेच ते कुणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही, असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रात म्हटलं होतं.
उद्धव ठाकरेंना लिहलेल्या ‘त्या’ पत्रात राज्यपालांनी काही शब्द टाळायला पाहिजे होते- अमित शाह
राज्यपालांना पॉलिटिकल एजंटसारखे वापरणे चांगल्या राज्यकर्त्याचे लक्षण नव्हे; राऊतांचा भाजपला टोला
Sharad Pawar letter to governor Bhagatsingh Koshyari on ‘coffee table’ book