मुंबई : महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा जवळपास सुटण्याच्या मार्गावर दिसत आहे. राज्यात महासेनाआघाडीचं सरकार स्थापन होणार हे जवळपास निश्चित (Sharad pawar meet sonia gandhi) झालं आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यात सलग तीन दिवस बैठका होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली (Sharad pawar meet sonia gandhi) आहे. येत्या 17, 18, 19 नोव्हेंबर अशा तीन दिवस दिल्लीत या बैठका होतील. यावेळी राज्यातील सत्तासमीकरणावर तोडगा काढण्यावर चर्चा होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली (Sharad pawar meet sonia gandhi) आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यात तीन दिवस चर्चा होणार आहे. सलग तीन दिवस म्हणजे 17,18, 19 नोव्हेंबरला या बैठका होणार आहेत. ही बैठक महासेना आघाडीबाबत चर्चेसाठी बोलवण्यात आली आहे. यात 17 नोव्हेंबरला चहापानावर चर्चा होणार आहे. या बैठकीसाठी दोन्ही पक्षातील महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या हायकमांडमध्ये सलग तीन दिवस मॅरेथॉन बैठका होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासाठी शरद पवार 17 नोव्हेंबरला सकाळी दिल्लीला रवाना होणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता सोनिया गांधी आणि शरद पवार यांची चाय पे चर्चा होईल. त्यानंतर पुढील दोन दिवस म्हणजे 18 आणि 19 नोव्हेंबरला पुन्हा मॅरेथॉन बैठका (Sharad pawar meet sonia gandhi) होतील.
या बैठकीला काँग्रेसकडून सोनिया गांधी यांच्यासोबत काँग्रेस नेते अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, सुनिल तटकरे हे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यातील सत्तासमीकरणावर तोडगा काढण्याबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे.
दरम्यान नुकतंच तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची पहिली समन्वय बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सत्तास्थापनेसाठी आवश्यक किमान समान कार्यक्रमाचा मसूदा तयार केला आहे.
महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्रिपदाची भूमिका जाहीर केली आहे. मुख्यमंत्रिपद हे शिवसेनेकडेच असेल, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी वारंवार सांगितलं आहे. मात्र अन्य मंत्रिपदांची वाटणी कशी करायची याबाबत समन्वय बैठकीत चर्चा झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तीनही पक्षांनी 14-14-12 असं मंत्रिपदाचं सूत्र ठरवल्याची माहिती आहे. त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्रिपद हे पाचही वर्ष शिवसेनेकडेच असेल, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे एक-एक उपमुख्यमंत्रिपद असेल, असंही सांगण्यात येत (Sharad pawar meet sonia gandhi) आहे.
संबंधित बातम्या :
सरकार येणार तर भाजपचंच : चंद्रकांत पाटील
मुख्यमंत्रिपदाची मागणी असेल, तर विचार करु : शरद पवार
शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस नेत्यांनी राज्यपालांच्या भेटीची वेळ मागितली