पुणे : महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढ्याबाबत चर्चेसाठी नुकतंच राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली (Sharad pawar meet sonia gandhi tomorrow) होती. या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची उद्या (18 नोव्हेंबर) दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीत राज्यातील महासेनाआघाडीबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत (Sharad pawar meet sonia gandhi tomorrow) आहे.
नुकतंच शरद पवारांच्या पुण्यातील निवासस्थानी मोदीबागेत ही बैठक झाली. राष्ट्रवादीच्या या बैठकीत जयंत पाटील, अजित पवार, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे यांसह इतर महत्त्वाचे नेते उपस्थित होते. पुण्यात झालेल्या या बैठकीत राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. याबाबत काँग्रेसशी बोलून चर्चा करु असा निर्णय झाल्याचेही नवाब मलिक म्हणाले.
दरम्यान उद्या शरद पवार आणि सोनिया गांधी यांची नवी दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीनंतर मंगळवारी राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची चर्चा करुन पुढील निर्णय घेतला जाईल, असेही नवाब मलिक म्हणाले. त्यामुळे महासेनाआघाडीबाबत काय निर्णय घेतला जातो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Nawab Malik, NCP: We have decided that next decision will be taken only after discussion with Congress. Tomorrow Congress President Sonia Gandhi and Pawar Sahab will hold a meeting and day after tomorrow leaders of both the parties will meet. https://t.co/TQ1ib7FMAg
— ANI (@ANI) November 17, 2019
“महाराष्ट्रात जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यावर या कोअर कमिटीच्या बैठकीच चर्चा झाली. राज्यातील राष्ट्रपती राजवट लवकरात लवकर संपावी आणि त्याऐवजी महाराष्ट्रात एक स्थिर सरकार स्थापन व्हावे. असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. राष्ट्रवादीने काँग्रेससोबत एकत्रित निवडणूक लढली आहे. त्यामुळे काँग्रेससोबत चर्चा करुनच यावर निर्णय घेऊ,” असे नवाब मलिक पत्रकार परिषदेदरम्यान म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यात सलग तीन दिवस मॅरेथॉन बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या. येत्या 17,18, 19 नोव्हेंबरला या बैठका होणार होती. मात्र आज 17 नोव्हेंबरला होणारी बैठक रद्द करण्यात आली. त्याऐवजी सोमवारी 18 नोव्हेंबरला शरद पवार आणि सोनिया गांधींची बैठक होणार आहे.
या बैठकीला काँग्रेसकडून सोनिया गांधी यांच्यासोबत काँग्रेस नेते अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, सुनिल तटकरे हे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
संबंधित बातम्या :
राष्ट्रवादीची पुण्यात बैठक, शरद पवार आणि सोनिया गांधींची भेट पुढे ढकलली
शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीची तारीख ठरली, महासेनाआघाडीच्या फॉर्म्युलावर अंतिम चर्चा ?