मुंबई : महाविकास आघाडीतील धुसफूस दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसत आहे. मुंबईतील दहा आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील तणाव आणखी वाढल्याचं दिसतं. त्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रचंड नाराज असून, मुख्यमंत्र्यांना या बदल्यांबाबत काहीच कल्पना नव्हती. त्यामुळेच अवघ्या तीन दिवसात या बदल्या रद्द करण्यात आल्या. (Sharad Pawar meeting with CM Uddhav Thackeray)
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख हे स्वत: ‘मातोश्री’वर जाऊन त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. महत्त्वाचं म्हणजे महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेनंतर शरद पवार हे ‘मातोश्री’वर जाण्याची ही केवळ दुसरीच वेळ होती. पोलिसांच्या बदल्या आणि पारनेरमध्ये शिवसेनेचे नगरसेवक फोडल्याचं एक कारण यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज आहेत. त्यामुळे शरद पवार यांना ‘मातोश्री’वर यावं लागल्याचं सांगण्यात येत आहे. (Sharad Pawar meeting with CM Uddhav Thackeray)
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख तसंच गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे साधारण संध्याकाळी 6 च्या सुमारास ‘मातोश्री’वर दाखल झाले. ‘मातोश्री’वर मुख्यमंत्र्यांसह पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
शरद पवार ‘मातोश्री’मध्ये गेल्यानंतर काही वेळातच म्हणजे संध्याकाळी 6.30 च्या सुमारास मंत्री आदित्य ठाकरे बाहेर पडले. त्यांच्यापाठोपाठ जितेंद्र आव्हाडही बाहेर आले.
यानंतर मग 10 मिनिटांनी म्हणजे 6 वाजून 40 मिनिटांच्या सुमारास गृहमंत्री अनिल देशमुख मातोश्रीवरुन बाहेर पडले. अनिल देशमुख बाहेर पडल्यानंतर शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोघांमध्येच चर्चा झाली. एकीकडे अनिल देशमुख मातोश्रीवरुन बाहेर पडत असताना, शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे 6 वाजून 48 मिनिटांनी मातोश्रीवर दाखल झाले. मात्र अवघ्या पाच सहा मिनिटातच शरद पवारही 6 वाजून 54 मिनिटांनी मातोश्रीवरुन निघाले.
त्यामुळे अवघ्या अर्धा- पाऊण तासात दिग्गज नेत्यांनी नेमकी कोणात्या विषयावर चर्चा केली, याबाबत राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लढवले जात आहेत.
शरद पवार-मुख्यमंत्र्यांच्या भेटीचा घटनाक्रम
(Sharad Pawar meeting with CM Uddhav Thackeray)
संबंधित बातम्या
LIVE | शरद पवार-अनिल देशमुख मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, ‘मातोश्री’वर खलबतं