शरद पवारांचा गेम की अजित पवारांचं बंड?

| Updated on: Nov 23, 2019 | 10:06 AM

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी (22 नोव्हेंबर) रात्रीपर्यंत शिवसेनेसोबत युती करण्याविषयी (Who is behind supporting BJP ) चर्चा केली.

शरद पवारांचा गेम की अजित पवारांचं बंड?
Follow us on

मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी (22 नोव्हेंबर) रात्रीपर्यंत शिवसेनेसोबत युती करण्याविषयी (Who is behind supporting BJP ) चर्चा केली. मात्र, शनिवारी (23 नोव्हेंबर) सकाळी अजित पवार यांनी (Who is behind supporting BJP )महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा धक्का दिला. राष्ट्रवादीने अचानक भाजपला पाठिंबा देत सत्तास्थापन केली. त्यामुळे भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णयामागे शरद पवारांची राजकीय खेळी आहे, की अजित पवार यांचा बंड या चर्चेला उधाण आलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सत्तास्थापनेविषयीच्या चर्चेत शरद पवार यांचाही सहभाग असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपला पाठिंबा देण्यासाठी शरद पवारांची अजित पवार यांना परवानगी असल्याचीही माहिती मिळत आहे.


मात्र, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते या निर्णयाबाबत अंधारात असल्याचंही दिसत आहे. सत्तास्थापनेनंतर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी या निर्णयाची माहिती नसल्याचं म्हटलं आहे. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ नेते आहेत. त्यामुळे थेट अजित पवार यांनीही पाठिंबा दिला असावा, अशी चर्चा आहे. त्यामुळे भाजपला दिलेला पाठिंबा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे की अजित पवार यांचा हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे.


सत्तास्थापनेनंतर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी सर्वात प्रथम आमचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, अध्यक्ष अमित शाह यांचे आभार मानतो. महाराष्ट्राच्या जनतेने स्पष्ट जनादेश दिला होता, तरीही आमचा मित्रपक्ष शिवसेनेने युती तोडली. त्यामुळे अखेर आम्ही महाराष्ट्राला स्थिर सरकार देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ नेत्यांनी आम्हाला पाठिंबा दिला. त्यानंतर आम्ही राज्यपालांकडे दावा केला. राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे याबाबत माहिती देऊन आज आम्हाला शपथविधीसाठी बोलावलं. आम्ही स्थिर सरकार देऊ. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहू.”

अजित पवार म्हणाले, “मागील अनेक दिवसांपासून सरकार स्थापन होत नव्हते. तसेच अनेक मागण्याही वाढत होत्या. त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला. शरद पवारांना याविषयी आधी माहिती दिली होती, पण नंतर मी त्यांना सांगत होतो की कोणी तरी दोघांनी किंवा तिघांनी एकत्र येऊन आल्याशिवाय सरकार स्थापन होणार नाही. त्यामुळेच हा निर्णय घेतला.”


या सर्व घडामोडींनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये प्रचंड मतभेद असल्याचं दिसून येत आहे.  राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी यावर ट्विट करत आपण मरेपर्यंत शरद पवार यांच्यासोबत असल्याचं सांगितलं. तसेच मी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा असल्याचंही नमूद केलं.