मुंबई: शरद पवार (Sharad Pawar) हे महाराष्ट्र घडवणाऱ्या व्यक्तींपैकी एक आहेत. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने फुले, शाहू, आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील आणि यशवंतराव चव्हाण यांच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केले. (Sharad Pawar is stalwart person like Mahatma Phule and Babasaheb Ambedkar)
शरद पवार यांनी शनिवारी वयाच्या 81 व्या वर्षात पदार्पण केले. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी ट्विट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या. हा महाराष्ट्र ज्यांच्यामुळे घडला, वाढला, समृद्ध झाला, सुजलाम- सुफलाम झाला अशा निवडक लोकांची नावं काढली तर त्यात अर्थात छत्रपती शिवाजी महाराज येतात. फुले, शाहू, आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, यशवंतराव चव्हाण यांचे स्थान आहे. आज त्या पंगतीत आपले नेते शरद पवार साहेबसुद्धा विराजमान झाल्याचे ट्विट जयंत पाटील यांनी केले.
हा महाराष्ट्र ज्यांच्यामुळे घडला, वाढला, समृद्ध झाला, सुजलाम- सुफलाम झाला अशा निवडक लोकांची नावं काढली तर त्यात अर्थात छत्रपती शिवाजी महाराज येतात. फुले, शाहू, आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, यशवंतराव चव्हाण यांचे स्थान आहे. आज त्या पंगतीत आपले नेते शरद पवार साहेबसुद्धा आहेत.
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) December 12, 2020
२०१९ च्या निवडणुकीत आपण सर्वांनी शरद पवार नावाचा करिष्मा बघितला आहे. स्वतःला देशाचे मालक समजणाऱ्या लोकांचा ‘बाप आला‘ असे म्हणत लोकांनी साहेबांचे राज्यभर स्वागत केले, त्यांचे नेतृत्व स्वीकारले. ‘शरद पवार जी कि राजनीती का दौर अब शुरू हुआ है’ हे विरोधकांनी जाणावे, असा इशाराही यावेळी जयंत पाटील यांनी दिला.
त्या काळात जर पवार साहेबांनी माझ्यासारख्या एका तरुण कार्यकर्त्यावर विश्वास टाकला नसता, तर आज इथे तुम्हाला तुमचा धनंजय मुंडे दिसला नसता, साहेबांचा वाढदिवस म्हणजे कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे”, अशा शब्दांत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
संबंधित बातम्या:
Sharad Pawar Birthday | पवारांच्या कोणत्या गोष्टीची अमृता फडणवीसांना भूरळ?
… आणि पवारांबद्दल बोलताना मुश्रीफांना अश्रू अनावर का?
शरद पवारांचा गावागावात राष्ट्रवादी पोहोचवण्याचा प्लॅन एका क्लिकवर
(Sharad Pawar is stalwart person like Mahatma Phule and Babasaheb Ambedkar)