मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमात जोरदार राजकीय टोलेबाजी केली. अजित पवार यांच्या नाराजीच्या चर्चेवरही त्यांनी यावेळी भाष्य केलं. अजित दादा नाराज असल्याची चर्चा होतेय, मात्र कशाचीही नाराज नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही काळजी घ्यावी लागते त्यामुळे ते कार्यक्रमात नाहीत, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं. यावेळी त्यांनी जनसेवेत झोकून देऊन काम केल्याने राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना कोरोनाची बाधा झाल्याचंही सांगितलं.
एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाने खानदेशात राष्ट्रवादी पक्षाच्या उभारणीला मदत होणार आहे. खानदेशात नवं नेतृत्व उभं करण्याचं काम एकनाथ खडसे यांनी केलंय. त्यामुळेच त्यांना भाजपचे अनेक आमदार खासदार निवडून आणता आले. आता त्यांच्या नेतृत्वात खानदेशात राष्ट्रवादीची ताकद वाढेल, असंही शरद पवार यांनी नमूद केलं.
शरद पवार म्हणाले, “आजचा दिवस फार आनंदाचा आहे. मी संबंध महाराष्ट्र आणि राष्ट्रवादी पक्षाच्या संघटनेचा विचार जेव्हा करतो त्यावेळी एक बदल दिसतो. नवी पीढी मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी व्हायला उत्सुक आहे. दिवसेंदिवस लोकांची कामं करण्यासाठी पक्षाची शक्ती वाढत आहे. त्यासाठी या संघटनेतील प्रत्येकजण कष्ट करतोय असं दिसतंय.”
“महाराष्ट्रात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी अधिक काम होणं गरजेचं आहे. अशा ठिकाणांचा मी जेव्हा विचार करतो तेव्हा माझ्या नजरेसमोर पहिल्यांदा खानदेश येतो. धुळे, जळगाव आणि नंदूरबार असेल या सर्व भागात आपल्याला अधिक काम करण्याची गरज आहे. अनेक सहकारी या ठिकाणी कष्ट करत आहेत, राबत आहेत आणि पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या कामाला खऱ्या अर्थाने गती यायची असेल तर एकनाथ खडसे यांच्या आजच्या निर्णयाने ही गती येईल, याबाबत माझ्या मनात शंका नाही,” असंही शरद पवार यांनी नमूद केलं.
“एकेकाळी गांधी नेहरुंच्या विचारांचा खानदेश असा या खानदेशचा लौकिक होता. काँग्रेस पक्षाच्या स्थापनेनंतर देशातील पहिली राष्ट्रीय काँग्रेस देशात ग्रामीण भागात कोठे झाली असेल तर ती जळगाव जिल्ह्यात झाली. हा संपूर्ण परिसर काँग्रेसच्या विचाराचा होता. या जिल्ह्यात खादीचा इतका प्रभाव होता की कुणाचाही सत्कार करताना नारळासोबत असलेला हातरुमाल देखील खादीचा असायचा,” असंही शरद पवार यांनी नमूद केलं.
शरद पवार यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे-
संबंधित व्हिडीओ :
संबंधित बातम्या :
40 वर्षात बाईला समोर ठेवून कधीच राजकारण केलं नाही : एकनाथ खडसे
‘काना मागून आला आणि तिखट झाला’; जयंत पाटलांची नाव न घेता फडणवीसांवर टीका
एकनाथ खडसे यांचा अखेर राष्ट्रवादीत प्रवेश, नव्या राजकीय इनिंगला सुरुवात!
Eknath Khadse Live Update | माझ्या मागे ED लावली तर मी CD लावेन : एकनाथ खडसे
Sharad Pawar speech while Eknath Khadse joining NCP in Mumbai