नवी दिल्ली : राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा आज (22 जुलै) राज्यसभा सदनात पार पडला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सलग दुसऱ्यांदा राज्यसभेचे खासदार म्हणून शपथ घेतली. आपल्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी सोळाव्यांदा शपथ घेतली. (Sharad Pawar took Oath as Rajyasabha MP 16th time Oath Ceremony as People’s representative)
79 वर्षीय शरद पवार यांनी आतापर्यंत 6 वेळा विधानसभा सदस्य, एकदा विधानपरिषद सदस्य, 7 वेळा लोकसभा सदस्य, तर दोनदा राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेतली आहे. लोकशाहीच्या चारही सदनात प्रतिनिधित्व करणारे ते एकमेव नेते असावेत.
शरद पवार हे महाराष्ट्राचे सर्वात युवा मुख्यमंत्रीही ठरले आहेत. बारामती मतदारसंघातून ते सलग पाच वेळा, तर एकूण सहा वेळा लोकसभेवर निवडून आले आहेत. तर कन्या सुप्रिया सुळे बारामतीतून रिंगणात उतरल्याने पवारांनी 2009 च्या निवडणुकीत माढा मतदारसंघातून खासदारकी मिळवली.
हेही वाचा : इंग्रजीतून शपथ घेऊन उदयनराजे म्हणाले, जय भवानी, जय शिवाजी, सभापतींकडून समज
नव्या नेतृत्वाला संधी देण्यासाठी 2014 मधील लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय पवारांनी 2012 मध्येच जाहीर केला. त्यानंतर वरिष्ठ सभागृह अर्थात राज्यसभेवर ते 2013 मध्ये नियुक्त झाले.
“गेली 53 वर्ष एक दिवसाचाही खंड न पडता लोकशाहीच्या सर्वोच्च सभागृहांचे सदस्य असणारे पवार हे भारतातील एकमेव व्यक्ती आहेत” असे ट्वीट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे.
देशाचे नेते, @NCPspeaksचे अध्यक्ष आदरणीय @PawarSpeaks साहेब यांनी आज राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. साहेबांच्या राजकीय कारकिर्दीतील लोकशाहीच्या मंदिराचे सदस्य म्हणून ही सोळावी शपथ आहे. अभिनंदन साहेब?@NCPspeaks pic.twitter.com/0XAvyHQZKX
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) July 22, 2020
दरम्यान, शरद पवार यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, काँग्रेस नेते राजीव सातव, भाजप नेते छत्रपती उदयनराजे भोसले, शिवसेना नेत्या प्रियांका चतुर्वेदी आणि भाजपच्या भागवत कराड अशा महाराष्ट्रातील सहा खासदारांनी शपथ घेतली. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीच्या नेत्या फौजिया खान यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे त्या उपस्थित नव्हत्या. आठवले आणि उदयनराजेंनी इंग्रजी, शरद पवारांनी हिंदी, तर कराड, सातव, चतुर्वेदी यांनी मराठीतून शपथ घेतली.
महाराष्ट्रातील सात खासदार
संबंधित बातमी
राज्यसभा खासदारांचा शपथविधी, उदयनराजेंची इंग्रजीत, पवारांची हिंदीत, चतुर्वेदींची मराठीत शपथ
(Sharad Pawar took Oath as Rajyasabha MP 16th time Oath Ceremony as People’s representative)