मुंबई : महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) युवा आमदारांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. त्यावेळी शरद पवार यांनी ‘घाबरून जाऊ नका, भाजपला पुन्हा राज्यात येऊ देणार नाही’, असा दावा करत भाजपला थेट आव्हान दिलंय. सध्या मुंबईत विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Session) सुरू आहे. त्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी जोरदार खडाजंगी रंगलीय. या वादळी अधिवेशात सहभागी होण्यासाठी शक्यतो बहुतांश आमदार उपस्थित आहेत. त्यापैकी महाविकास घाडीच्या युवा आमदारांनी आज पवारांची भेट घेतली. दरम्यान, पवार यांच्या या आव्हानाला आता भाजपकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय. ‘आदरणीय पवारसाहेब, भाजपची काळजी करु नका. स्वत:च्या पक्षाचे 60 च्या वर आमदार निवडून आणा’, असा पलटवार भाजपनं केलाय.
आदरणीय पवार साहेब, भाजपची काळजी करू नका! स्वतःच्या पक्षाचे 60 च्या वर आमदार निवडून आणा. इतर प्रादेशिक पक्षांनी 10 वर्षात दोन राज्यात सत्ता स्थापन केली आहे, तुम्ही अजून साडे तीन जिल्ह्यातच अडकलात. 55 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत स्वतःच्या पक्षाचा मुख्यमंत्री बनवून दाखवा!, असं प्रतिआव्हान भाजपनं पवारांना दिलंय.
आदरणीय @PawarSpeaks साहेब, भाजपची काळजी करू नका! स्वतःच्या पक्षाचे 60 च्या वर आमदार निवडून आणा.
इतर प्रादेशिक पक्षांनी 10 वर्षात दोन राज्यात सत्ता स्थापन केली आहे, तुम्ही अजून साडे तीन जिल्ह्यातच अडकलात.
55 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत स्वतःच्या पक्षाचा मुख्यमंत्री बनवून दाखवा!
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 17, 2022
त्याचबरोबर आदरणीय पवारजी, भाजपला येऊ न देण्याच्या गोष्टी नंतर करा. आधी हे प्रश्न सोडून दाखवा म्हणत भाजपनं,
– राज्यात एसटी बंद, 6 महिन्यापासून कर्मचारी संपावर आहेत.
– राज्यात शेतकऱ्यांची वीज तोडली जात आहे, पिकं उभं उभं करपून जात आहेत.
– मराठा, OBC आरक्षणाचा प्रश्न सोडून दाखवा, असं म्हणज पवारांना चिमटा काढलाय.
आदरणीय @PawarSpeaks जी, भाजपला येऊ न देण्याच्या गोष्टी नंतर करा. आधी ? हे प्रश्न सोडून दाखवा!
– राज्यात एसटी बंद, 6 महिन्यापासून कर्मचारी संपावर आहेत.
– राज्यात शेतकऱ्यांची वीज तोडली जात आहे, पिकं उभं उभं करपून जात आहेत.
– मराठा, OBC आरक्षणाचा प्रश्न सोडून दाखवा.— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 17, 2022
पवार आणि महाविकास आघाडीच्या युवा आमदारांची सिल्वर ओकवर जवळपास दोन तास ही बैठक चालली. या बैठकीत पवारांनी चर्चेमध्ये युवा आमदारांची मते जाणून घेतली. त्याचबरोबर यशस्वी राजकीय वाटचालीसाठी काही कानमंत्रही दिले. बैठक संपून आमदार निघण्याच्या तयारीत असताना शरद पवार उभे राहिले. त्यांनी आपले दोन्ही हात वर करीत आणि वज्रमूठ तयार करीत, घाबरायचे काही कारण नाही. मी भाजपला पुन्हा राज्यात येऊ देत नाही, असा दावा केला. इतकंच नाही तर भाजप आपला राजकीय प्रतिस्पर्धी आहे. त्यांच्या अनेक नकारात्मक गोष्टी असल्या, तरी त्यांच्या नेत्यांकडून शिकण्यासारख्या काही गोष्टी असल्याचे मत पवार यांनी व्यक्त केलं. त्यात दिवस-रात्र मेहनत घेण्याची तयारी, कामाचे मार्केटिंग, नियोजनबद्ध व्यूहरचना आखून निवडणूक लढण्याची तयारी. हे भाजपकडून शिकावं असं आवाहन पवारांनी केलंय.
इतर बातम्या :