सातारा : माजी खासदार आणि भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी जाणता राजा या उपाधीवरुन साधलेल्या निशाण्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawars answer to Udayanraje Bhonsale) यांनी त्यावर भाष्य केलं आहे. खटाव- माण साखर कारखान्याच्या 251001 व्या साखर पोत्याचे पूजन शरद पवारांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी पवारांनी जाणता राजा यावरुन उदयनराजेंनी केलेल्या टीकेला उत्तर दिलं. (Sharad Pawars answer to Udayanraje Bhonsale)
शरद पवार म्हणाले, “मी कुठेच म्हणालो नाही की मला जाणता राजा म्हणा. जाणता राजा हा शब्द रामदास स्वामींनी आणला. शिवाजी महाराज यांचे गुरु रामदास नव्हते. तर जिजाऊ या गुरु होत्या. शिवाजी महाराजांचे गुरु रामदास स्वामी होते ही लेखणीची कमाल आहे. छत्रपती ही शिवाजी महाराजांची खरी उपाधी आहे”.
याशिवाय इथे (कार्यक्रमाला) आल्यापासून सगळे पत्रकार प्रतिक्रियेसाठी माझ्या मागे लागले आहेत. मात्र मी तरी कोणाला बोललो नाही. रामराजे निंबाळकर (उदनयराजेंवर) बोलायला पुरशे आहेत. मी कुठेच नाही म्हणालो मला जाणता राजा म्हणा. शिवचरित्राचा व्यवस्थित अभ्यास केल्यास जाणता राजा ही उपाधी शिवाजी महाराजांना कधीच लावण्यात आली नव्हती. शिवाजी महाराज यांचे गुरु रामदास स्वामी नव्हते. तर जिजाऊ या गुरू होत्या. शिवाजी महाराजांचे गुरु रामदास होते ही लेखणीची कमाल. लेखणीची छत्रपती ही शिवाजी महाराजांची खरी उपाधी, असं म्हणत शरद पवारांनी उदयनराजेंना उत्तर दिलं.
उदयनराजे काय म्हणाले होते?
या जगात जाणता राजा फक्त छत्रपती शिवराय होते. त्यांची तुलना कोणाशी होऊ शकत नाही. लोकांनी बुद्धी गहाण ठेवली का ते कळत नाही, छत्रपती शिवाजी महाराजांशी कुणाची तुलना होऊ शकत नाही. छत्रपती शिवरायांच्या जवळही जाण्याची कोणाची लायकी नाही”, असं उदयनराजे भोसले म्हणाले.
सो कॉल्ड जाणते राजे कोणी त्यांना उपमा दिली माहिती नाही. आरक्षणाचा विषय का लांबवता. शिवसेनेने इतिहास संशोधक आहात असं म्हणत माफी मागितली.कोणताही पक्ष असला तरी सोयीप्रमाणे सर्वजण त्यांचं नाव का घेता. त्यांचं आचरण केलं असतं तर ही परिस्थिती आली नसती. हे तुम्ही लोकांनी निवडून दिलेले लोकशाहितले राजे जाणते राजे म्हणे. राज्याच्या खेळळांडो केलाय, किळस वाटते.
संबंधित बातम्या
जाणता राजा फक्त छत्रपती शिवराय, उदयनराजेंचा हल्लाबोल, पवार, ठाकरेंवर घणाघात