नवनीत राणांसाठी सभा, शरद पवार म्हणाले मोदींनी वाटोळं केलं!

| Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM

अमरावती : अमरावती लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाघाडीच्या उमेदवार नवनीतकौर राणा यांच्या प्रचारासाठी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा झाली. संत ज्ञानेश्वर संस्कृतिक भवनात झालेल्या प्रचार सभेत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली. गांधी कुटुंबाने देशासाठी काय केले याचा पाढा वाचणाऱ्या मोदींनी गेल्या पाच वर्षात आपण कोणते दिवे लावले, हे जनतेला सांगावे, […]

नवनीत राणांसाठी सभा, शरद पवार म्हणाले मोदींनी वाटोळं केलं!
Follow us on

अमरावती : अमरावती लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाघाडीच्या उमेदवार नवनीतकौर राणा यांच्या प्रचारासाठी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा झाली. संत ज्ञानेश्वर संस्कृतिक भवनात झालेल्या प्रचार सभेत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली.

गांधी कुटुंबाने देशासाठी काय केले याचा पाढा वाचणाऱ्या मोदींनी गेल्या पाच वर्षात आपण कोणते दिवे लावले, हे जनतेला सांगावे, अशी टोलेबाजी पवारांनी केली.

मोदींनी गेल्या पाच वर्षात देशाचे वाटोळे केले. कृषी विकासदर घसरला असून, देशातल्या संवैधानिक संस्था नामशेष करण्याचे काम त्यांनी केले आहे. सैन्याने दाखविलेल्या शौर्यावरही ते आपलाच अधिकार दाखवत आहेत, असा आरोप पवारांनी केला.

विंग कमांडर अभिनंदनच्या सुटकेनंतरही आपल्या 56 इंचाच्या छातीचे वारंवार प्रदर्शन मांडणाऱ्या मोदींनी, गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानी तुरुंगात असलेल्या कुलभूषण यांना भारतात आणण्यासाठी काय प्रयत्न केले हे सांगावे, असा सवाल पवारांनी केला.

मोदी हे देशावर आलेले संकट नसून राष्ट्रीय आपत्ती आहे,ही आपत्ती  घालवणे गरजेचे आहे. देशातील न्यायव्यवस्था, RBI, CBI या संस्था मोदींनी मोडकळीस काढल्या,त्या टीकवून ठेवण्याची गरज आहे, असं पवार म्हणाले.

मोदी म्हणतात माझं बोट धरुन राजकारणात आलो. मात्र तेव्हापासून मी माझे बोट आणि हात लांब ठेवत आहे. माझं बोट धरल्याचं सांगून इतकं वाटोळे करत असेल, तर हात धरल्यावर देशाचं आणखी किती वाटोळे करेल काय माहित, असा टोमणा पवारांनी लगावला.