अमरावती : राज्यात हनुमान चालीसा वाचनावरून वाद रंगलेला आहे. आधी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आजानवर टीका करताना भोंगे उतारा अन्यथा हनुमान चालीसा लावू असा इशारा दिला होता. तसेच त्यांनी राज सरकारला अल्टीमेट देत भोंगे उतरा नाहीतर आम्ही उतरू असे म्हटले होते. त्यानंतर याप्रकरणावर राजकारण तापतच चालले आहे. आता याच विषयावरून अमरावतीचे आमदार-खासदार असणारे दाम्पत्याने यात उडी घेतली आहे. यावेळी आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी, हनुमान जयंतीच्या पर्वावर उद्या सकाळी मी आणि खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) हनुमानाच्या मंदिरात हनुमान चालीसा वाचणार तेही भोंगा लावून असे म्हटले होते. तसेच भोंग्यांचं वाटप करणार आहोत, असं राणा यांनी ठणकावून सांगितलं होतं. तर त्यांनी यावेळी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी सुद्धा हनुमान जयंतीच्या पर्वावर हनुमान चालीसा वाचली पाहिजे असं म्हटलं होतं. जर उद्धव ठाकरे हनुमान चालीसा वाचत नसतील तर मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा वाचू, असे म्हटले होते. या वक्त्यव्यानंतर शिवसैनिक चांगलेच भडकले असून त्यांनी राणा दाम्पत्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. तसेच रवी राणा यांच्या आव्हानाला शिवसेना प्रतिउत्तर देणार असल्याचेच संकेत शिवसेना महानगर प्रमुख पराग गुडधे यांनी दिला आहे.
आमदार रवी राणा यांनी बाळासाहेबांचे नाव घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाना साधला होता. तसेच मुख्यमंत्री ठाकरे यांनी हनुमान जयंतीच्या पर्वावर हनुमान चालीसा वाचली पाहिजे. जर उद्धव ठाकरे हनुमान चालीसा वाचत नसतील तर मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा वाचू, असे म्हटले होते. तर मुख्यमंत्री ठाकरे यांना बाळासाहेबांच्या विचारांचा जो विसर पडल्याचे त्यांनी म्हटले होते. तसेच बाळासाहेबांच्या विचारांचा ठाकरे यांना जाणीव करून देऊ. असेही त्यांनी म्हटले होते. तसेच आपल्या या कृतीतून एक धार्मिक संदेश देणार असल्याचं आमदार रवी राणा म्हणाले होते. त्यानंतर रवी राणा यांनी मातोश्री समोर जाऊन हनुमान चालीसा वाचली नाही तर अमरावतीचे शिवसैनिक रविवारी राणा यांच्या घरासमोर जाऊन हनुमान चालीसा वाचतील असा इशारा शिवसेना महानगर प्रमुख पराग गुडधे यांनी दिला. तसेच त्यांनी म्हटले की, मातोश्री हे शिवसैनिकांच मंदिर आहे ते भाजपच्या नेत्याच घर नसल्याचे म्हटलं आहे. आणि तुम्ही जर मातोश्री वर हनुमान चालीसा वाचायला गेलात तर शिवसैनिक तुमचाच हनुमान केल्याशिवाय राहणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा विसर पडल्याची टीका आमदार रवी राणा यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी हनुमान चालीसा वाचला नाही तर मी व खासदार नवनीत राणा मुख्यमंत्र्याच्या मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचू, असा इशारा आमदार रवी राणा यांनी दिला. त्यामुळं उद्या हनुमान जयंतीला काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. उद्या अमरावतीत पगडीवाले हनुमान मंदिरात सकाळी 9 ते 11 या वेळात हनुमान चालीसाचे पठण करून स्वतः मंदिरावर भोंगे चढवणार आहेत. उद्या हनुमान जयंती दिनी राणा दाम्पत्याचे हनुमान चालीसा पठण करणार आहेत.