मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) 41 आमदार शिंदे गटाकडे असल्याचा दावा करण्यात आला आहे. याचाच अर्थ दोन तृतीआंश आकड्यापेक्षा जास्त आमदार हे शिंदे गटात आहेत, हे स्पष्ट होतंय. तर आता उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांच्याकडे अवघे 14 आमदार शिल्लकर उरले आहेत. यामुळे अख्खीच्या अख्खी शिवसेनाचा आता एकनाश शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे आल्याचं दिसतंय. 41 शिवसेना आमदार गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत, असंही सांगितलं जातंय. त्यामुळे शिवसेनेच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं संकट ठाकरेंपुढे उभं राहिलंय.
बंडानंतर एकनाथ शिंदे गट मजबूत!
सोमवारी विधान परिषदेची निवडणूक झाली. निकालात शिवसेनेची तीन मतं फुटल्याचंही समोर आलं. भाजपचे पाचही उमेदवार विधान परिषदेवर निवडून आले. या रात्रीपासूनच एकनाथ शिंदे नॉट रिचेबल होते. पहाटेच बातमी समोर आली. मंगळवारी सकाळपासून ते दिवसभर ते सूरतमध्ये आमदारांसोबत असल्याचं स्पष्ट झालं. पण नंतर सूरत हे महाराष्ट्रापासून हाकेच्या अंतरावर असल्यानं आमदारांना आसामच्या गुवाहाटीमध्ये हलवण्यात आलं. तिथून आमदारांशी शिवसेनाला आणि उद्धव ठाकरेंचा शिष्टाई करणं सोपं जाणार नाही, हे लक्षात घेऊन एकनाथ शिंदे यांनी रणनिती आखली होती. त्यानुसार आता मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तात आमदारांना आसामच्या गुवाहाटीमधील रेडिसन ब्लू या हॉटेलमध्ये ठेवण्यात आलंय. गेल्या 24 तासांत शिंदे गटातील आमदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.