बंडखोर आमदारांच्या मनधरणीसाठी शिवसेनेचा कार्यकर्ता साताऱ्याहून थेट आसाममध्ये पोहोचला; पोलिसांनी हॉटेलबाहेर ताब्यात घेतला

| Updated on: Jun 24, 2022 | 3:16 PM

शिवसेनेकडून आजूनही बंडखोर आमदारांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र त्यात काही यश येताना दिसून येत नाही. बंडखोर आमदारांना भेटण्यासाठी आसाममध्ये पोहोचलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

बंडखोर आमदारांच्या मनधरणीसाठी शिवसेनेचा कार्यकर्ता साताऱ्याहून थेट आसाममध्ये पोहोचला; पोलिसांनी हॉटेलबाहेर ताब्यात घेतला
Follow us on

गुवाहाटी : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे शिवसेनेमधून (shivsena) बंडंखोरी करत बाहेर पडल्याने शिवसेनेत फूट पडली आहे. जवळपास 50 आमदारांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. तर दुसरीकडे शिवसेनेकडे असलेल्या आमदारांची संख्या कमी झाल्याचे शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील मान्य केले आहे. आता शिवसेनेकडून या बंडखोर आमदारांची मनधरणी सुरू आहे. मात्र त्यात काही यश येताना दिसत नाहीये. भाजपासोबत युती या एकाच मागणीवर हे आमदार आडून बसले आहेत. दरम्यान या सर्व बंडखोर आमदारांना गुवाहाटीमधील हॉटेल रॅडिसन ब्लूमध्ये ठेवण्यात आले आहे. बंडखोर आमदारांनी शिवसेनेत परत यावे यासाठी त्यांची भेट घेण्यासाठी गुवाहाटीला गेलेल्या एका शिवसेनेच्या नेत्याला आसाम पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संजय भोसले असे त्यांचे नाव आहे. ते शिवसेनेचे सातारा उपजिल्हाप्रमुख आहेत.

हॉटेलबाहेर घेतले ताब्यात

गुवाहाटीमधील हॉटेल रॅडिसन ब्लूमध्ये शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना ठेवण्यात आले आहे. या आमदारांची मनधरणी करण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी शिवसेनेचे सातारा जिल्हाप्रमुख संजय भोसले हे त्या हॉटेलजवळ पोहोचले होते. मात्र त्यांना आसाम पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संजय भोसले हे या आमदारांना परत मुंबईमध्ये परतण्याचे आवाहन करणार होते, मात्र त्यापूर्वीच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान आता एकनाथ शिंदे यांचे परडे आणखी जड होताना दिसत आहे. एकनाथ शिंदे यांना समर्थन देणाऱ्या आमदारांची संख्या वाढतच आहे. तर दुसरीकडे शिवसेनेला धक्क्यावर धक्के बसत आहेत. शिवसेनेच्या गटात आता अवघे 13 ते 14 आमदार राहिल्याची माहित समोर येत आहे.

हे सुद्धा वाचा

 

उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल

दरम्यान आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. एकनाथ शिंदेसाठी मी काय नाही केले. मी त्यांना नगरविकास मंत्रीपद दिले. त्यांनी शिवसेने नाव न वापरता जगून दाखवावे. सजंय राठोड यांच्यावर देखील नको ते आरोप झाले होते, मात्र त्यांना देखील मी सांभाळून घेतले. जे म्हणत होते की मी शिवसेनेसाठी जीव देईल तेच आज पळून गेले असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. माझं मुख्यमंत्रिपद नाकारणं ही राक्षसी महत्त्वाकांक्षा आहे, झाडाचे फळ न्या, फूल न्या, फांदी देखील न्या पण मुळावर घाव घालू नका असे यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.