Shiv Sena – BJP मुंबई : भाजप आणि शिवसेनेची (Shiv Sena BJP) जागावाटपासंदर्भात पहिली बैठक पार पडली. भाजपकडून चंद्रकांत पाटील तर शिवसेनेकडून सुभाष देसाई यांच्यात चर्चा झाली. या बैठकीत मित्रपक्षांना भाजपच्या कोट्यातील जागा देण्यात याव्या, अशी भूमिका शिवसेनेने मांडली. त्याला भाजपने नकार दिला. मित्रपक्षांना सेना-भाजप दोघांच्या कोट्यातून जागा असव्यात अशी भूमिका भाजपने मांडली. त्यामुळे आता मित्रपक्षाच्या जागांवर युतीचं बोलणी अडली. त्यामुळे आता दुसरी बैठक लवकरच होणार आहे.
शिवसेनेला 100 जागाच?
शिवसेनेला 100 च्या आताच जागा देण्यावर भाजप ठाम आहे. भाजपच्या अंतर्गत सर्व्हेत भाजप किमान 160 जागा जिंकेल असा अनुमान आहे. त्यामुळे भाजप 160 पेक्षा अधिक जागा लढणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
288 पैकी अशा काही 50 जागा आहेत ज्या शिवसेनेला हव्या आहेत. मात्र शिवसेनेला त्या जागा दिल्यास शिवसेना एखादी जागाही निवडून येऊ शकत नाही, असा भाजपचा सर्व्हे आहे.
महाराष्ट्रात लोकसभेला शिवसेनेच्या ज्या जागा निवडून आल्या आहेत, त्या ठिकाणीही शिवसेनेची ताकद कमी झाल्याचा भाजपचा दावा आहे. पण तरीही ज्या जागा शिवसेनेच्या आहेत त्या देण्याची भाजपची तयारी आहे, असं सूत्रांनी सांगितलं.
सत्ता आणि जागा 50-50 : संजय राऊत
शिवसेना आणि भाजप (Shiv Sena BJP) यांच्यातील जागा आणि सत्तावाटपाचा फॉर्म्युला भाजप अध्यक्ष अमित शाह (Amit Shah) यांच्यासमोरच ठरला आहे. त्यानुसार जागा आणि सत्तेमध्ये 50-50 टक्के वाटा सेना-भाजपचा (Shiv Sena BJP) असेल, असं शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितलं. नाशिकमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
लोकसभेवेळी काय ठरलं होतं?
दरम्यान लोकसभा निवडणुकीवेळी उद्धव ठाकरे, अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 18 फेब्रुवारी 2019 रोजी एकत्र पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा केली होती. त्यावेळी लोकसभेला शिवसेना 23 आणि भाजप 25 जागा लढण्यावर शिक्कामोर्तब झालं होतं.
त्यावेळी शिवसेनेची दुसरी अट होती ती म्हणजे विधानसभेचा फॉर्म्युला. या पुढच्या सर्व निवडणुका शिवसेना आणि भाजप एकत्र लढणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. विधानसभेलाही निम्म्या निम्म्या जागा लढवल्या जातील. विधानसभा निवडणुकीच्या वेळी मित्रपक्षांशी चर्चा केली जाईल आणि उरलेल्या जागा निम्म्या निम्म्या लढवल्या जातील, असं मुख्यमंत्री म्हणाले. जनता पुन्हा आम्हाला निवडून देईल, त्यामुळे पद आणि जबाबदाऱ्या यांचंही समान वाटप होईल, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं.
VIDEO: भाजप शिवसेना युतीची घोषणा झाली ती पत्रकार परिषद
संबंधित बातम्या
जागा आणि सत्ता फिप्टी- फिप्टी, अमित शाहांसमोरच फॉर्म्युला ठरला : संजय राऊत
युतीचा फॉर्म्युला ठरला, शिवसेनेच्या या तीन अटी भाजपकडून मान्य