Shiv sena : ठाकरेंना आणखी एक धक्का? शिवसेनेतला एक मोठा नेता आज शिंदे गटात सामील होणार

| Updated on: Jun 27, 2022 | 7:04 AM

शिवसेनेला धक्क्यावर धक्के बसतच आहेत. आता आज आणखी एक आमदार शिवसेनेतून एकनाथ शिंदे गटात सहभागी होण्याची शक्यता आहे. हा आमदार आज दुपारी मुंबईहून गुवाहाटीला जाणार आहे.

Shiv sena : ठाकरेंना आणखी एक धक्का? शिवसेनेतला एक मोठा नेता आज शिंदे गटात सामील होणार
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे
Image Credit source: TV9
Follow us on

मुबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेशी (Shiv sena)  बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेमध्ये फुट पडली आहे. शिवसेनेतील आमदारांच्या एका मोठ्या गटाचा एकनाथ शिंदे यांना पाठिंबा मिळाला आहे. 40 पेक्षा अधिक आमदार शिंदे गटात सहभागी झाले आहेत. शिवसेनेला धक्क्यावर धक्के बसतच आहेत. रविवारी मंत्री उदय सामंत (Uday Samant) हे देखील शिंदे गटात सहभागी झाले आहेत. दरम्यान आज देखील शिवसेनेला एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. आणखी एक आमदार आज शिवसेनेतून शिंदे गटात जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारं नाव समोर येण्याची शक्याता आहे. मुंबईमधून हा आमदार आज दुपारी गुवाहाटीला जाण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. आता हा आमदार नेमका कोण यावरून चर्चेला उधाण आले आहे.

राऊतांचा बंडखोर आमदारांवर घणाघात

शिवसेनेतून एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येनं आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेत तर फुट पडलीच आहे. मात्र त्यासोबतच महाविकास आघाडी सरकार देखील अस्थिर बनले आहे. सुरुवातीला शिवसेनेकडून या आमदारांची मनधरणी करण्यात येत होती. मात्र त्यात यश न आल्याने आता ही बंडखोरी मोडून काढण्यासाठी शिवसेना मैदानात उतरली आहे. शिवसेनेकडून देखील जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे. काल दहीसरमध्ये झालेल्या मेळाव्यात संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांचा चांगलाच समाचार घेतला. या आमदारांनी पुन्हा मुंबईत येऊन दाखवावे असे आव्हानच थेट आता संजय राऊत यांनी दिले आहे. तसेच 40 आमदारांनी पक्ष सोडला म्हणून शिवसेना संपत नाही, असे अनेक धक्के शिवसेनेने पचवल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

राज्यभरात शिवसैनिकांचे आंदोलन

शिवसेनेमध्ये फूट पडली आहे. शिवसेनेतील एका मोठ्या आमदारांच्या गटाने एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिल्याने सरकार अल्पमतात आल्याचे चित्र आहे. दररोज एकतरी आमदार शिंदे गटात सहभागी होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसैनिकांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. शिवसैनिक आक्रमक झाले असून, शिवसैनिकांच्या वतीने राज्यभरात बंडखोर आमदारांविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. काही बंडखोर आमदारांच्या कार्यालयाची देखील शिवसैनिकांकडून तोडफोड करण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर बंडखोर आमदारांच्या कुटुंबीयांना सुरक्षा पुरवण्यात  आली आहे.