रत्नागिरी : शिवसेना आणि भाजपमध्ये सत्ता स्थापनेसाठी संघर्ष सुरु आहे. दोन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोड्या करत आहेत. त्यातच आता शिवसेनेच्या बालेकिल्यात भाजपने पोटर्स वॉर (Shiv Sena BJP poster war) सुरु केलं आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर शहरात भाजपने (Shiv Sena BJP poster war) पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) अशी बॅनर्स झळकवली आहेत.
राजापूर रिफानयरीचा मुद्दा गरम असताना या बॅनर्सने शिवसेनेला एकप्रकारे डिवचलं आहे. राजापूर शहरातील मुख्य रस्त्यांवर हे बॅनर्स भाजपने झळकावून, सेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
मातोश्रीबाहेरील होर्डिंग हटवले
बृहन्मुंबई महानगरपालिकेने ‘मातोश्री’ बाहेरील होर्डिंग्ज हटवले. या होर्डिंग्जवर ‘महाराष्ट्रातील मुख्यमंत्री फक्त आदित्य ठाकरे’ असे लिहिले होते. मात्र ठाकरे निवासस्थानाबाहेरील होर्डिंग्ज महापालिकेने हटवले.
मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच
मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, असा सूर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कायम ठेवला आहे. ज्यांच्याकडे बहुमत नाही, त्यांनी धाडस करु नये, शिवसेना बहुमत सिद्ध करु शकते, असा इशाराही राऊत यांनी दिला. संजय राऊत यांनी पुन्हा पत्रकार परिषद (Sanjay Raut on Shivsena CM) घेत भाजपला आव्हान दिलं.
आम्ही हवेत बोलत नाहीत, आकडे नसताना आमचं सरकार येणार हे आम्ही कधीही म्हटलं नाही. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, हे लिहून घ्या. शिवसेनेने मनावर घेतलं, तर स्थिर सरकारसाठी शिवसेना बहुमत सिद्ध करु शकते, असं संजय राऊतांनी दंड फुगवून सांगितलं.