राजू शेट्टींविरोधात शिवसेनेचा नवा उमेदवार

| Updated on: Jan 15, 2021 | 8:07 PM

मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. शिवसेना महाराष्ट्रात 23 जागा लढवणार आहे. त्यापैकी 21 जागा शिवसेनेने आज जाहीर केल्या.  शिवसेनेने आज बहुतेक सर्व जागा जाहीर केल्या, मात्र 2 जागा राखून ठेवल्या. या दोन जागांमध्ये  पालघर आणि सातारा लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. शिवसेनेने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात हातकणंगले लोकसभा […]

राजू शेट्टींविरोधात शिवसेनेचा नवा उमेदवार
Dhairyashil Mane and Raju Shetti
Follow us on

मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. शिवसेना महाराष्ट्रात 23 जागा लढवणार आहे. त्यापैकी 21 जागा शिवसेनेने आज जाहीर केल्या.  शिवसेनेने आज बहुतेक सर्व जागा जाहीर केल्या, मात्र 2 जागा राखून ठेवल्या. या दोन जागांमध्ये  पालघर आणि सातारा लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे.

शिवसेनेने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात हातकणंगले लोकसभा मतदारसंघात उमेदवार दिला आहे. राजू शेट्टींविरोधात शिवसेनेकडून धैर्यशील माने मैदानात उतरणार आहेत.

आघाडीच्या घोषणेपूर्वीच राष्ट्रवादीने राजू शेट्टींना जागा सोडली! 

गेल्या 2014 च्या निवडणुकीत राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना शिवसेना-भाजपच्या महायुतीसोबत होती. त्यावेळी राजू शेट्टींविरोधात काँग्रेसने कल्लाप्पा आवाडे यांना तिकीट दिलं होतं. राजू शेट्टींना त्यांचा पराभव केला होता. यंदा ते काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाणार हे जवळपास निश्चित आहे. त्यांच्यासमोर यंदा धैर्यशील माने यांचं आव्हान आहे. धैर्यशील माने हे पहिलीच लोकसभा निवडणूक लढत आहेत. मात्र त्यांची राजकीय पार्श्वभूमीवर मोठी आहे. त्यांची आई निवेदिता माने या दोनवेळा खासदार होत्या. तर त्यांचे आजोबा बाळासाहेब माने हे पाचवेळा खासदार होते.

कोण आहेत धैर्यशील माने?

  • 39 वर्षीय धैर्यशील माने हे राष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता माने यांचे सुपुत्र आहेत.
  • निवेदिता माने आणि धैर्यशील माने यांनी नोव्हेंबर 2018 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला.
  • धैर्यशील माने यांनी रुकडी ग्रामपंचायत निवडणुकीपासून राजकारणाला सुरुवात केली
  • आलास आणि पट्टणकोडोली मतदार संघातून जिल्हा परिषदेत एन्ट्री
  • याच दरम्यान जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून अडीच वर्षे काम केलं
  • tv9marathi.com
  • त्यानंतर माने गट टिकवण्यासाठी प्रयत्न केला, पण राष्ट्रवादी काँग्रेसकडून दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला
  • यानंतर त्यांच्या आई निवेदिता माने आणि धैर्यशील माने यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला
  • आधीच्या इचलकरंजी आणि आताच्या हातकणंगले मतदारसंघाचे माने गटाने 35 वर्षे नेतृत्व केले
  • आजोबा बाळासाहेब माने पाच वेळा खासदार होते तर आई निवेदिता माने राष्ट्रवादी काँग्रेसकडून दोन वेळा खासदार होत्या.

संबंधित बातम्या 

आघाडीच्या घोषणेपूर्वीच राष्ट्रवादीने राजू शेट्टींना जागा सोडली!

शिवसेनेच्या पहिल्या यादीत एका विद्यमान खासदाराला डच्चू 

पार्थ पवारांसमोर शिवसेनेचा उमेदवार ठरला! 

21 उमेदवार जाहीर, पण शिवसेनेने या दोन जागा राखून का ठेवल्या? 

लोकसभा निवडणूक : शिवसेनेची यादी जाहीर  

हातकणंगले लोकसभा : 2014 ला एनडीए, 2019 ला राजू शेट्टींच्या खांद्यावर यूपीएचा झेंडा?