सात-बारा कोरा करण्याचं वचन शिवसेना पूर्ण करणार : उद्धव ठाकरे

| Updated on: Nov 15, 2019 | 5:02 PM

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे आज परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी सांगली आणि सातारा दौऱ्यावर आहेत.

सात-बारा कोरा करण्याचं वचन शिवसेना पूर्ण करणार : उद्धव ठाकरे
Follow us on

सांगली/सातारा : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray wet drought) हे आज परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी सांगली आणि सातारा दौऱ्यावर आहेत. सांगली नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray wet drought)यांनी साताऱ्याकडे कूच केली.

“मी पाहणी करण्यासाठी आलो आहे, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आलो आहे. एका भागात जर एवढे नुकसान झाले असेल तर राज्यात किती नुकसान झाले असेल? सातबारा कोरा करण्याचं वचन शिवसेना पूर्ण करणार”, असं आश्वासन यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिलं.

शिवसेनेना शेतकऱ्यांसाठी मदत केंद्रे सुरू करणार असून, तुम्ही खचून जाऊ नका आणि आत्महत्येचा विचारही मनात आणू नका, शिवसेना तुमच्या पाठीशी आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मी मुख्यमंत्रिपदासाठी आलेलो नाही, मी तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे ओला दुष्काळ दौरा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे ओल्या दुष्काळामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी करत आहेत. सातारच्या माण-खटाव मतदारसंघातील मायणी  इथल्या शिवाजी देशमुख या शेतकऱ्याचं पावसामुळे द्राक्ष शेतीचं मोठे नुकसान झाले. याची पाहणी उद्धव ठाकरे यांनी केली.