Shiv Sena : राऊतांना वगळून शिवसेना खासदारांची दिल्लीत डिनर डिप्लोमसी; शिंदे-फडणवीस दिल्लीत असतानाच बैठक झाल्याने चर्चा

| Updated on: Jul 09, 2022 | 11:41 AM

Shiv Sena : शिवसेनेचे नागपूरचे रामटेकचे आमदार कृपाल तुम्हाणे यांच्या पुढाकाराने शिवसेना खासदारांची ही बैठक पार पडली. तुम्हाणे यांच्या दिल्लीतील बीकेसी मार्गावरील निवासस्थानी ही बैठक पार पडली.

Shiv Sena : राऊतांना वगळून शिवसेना खासदारांची दिल्लीत डिनर डिप्लोमसी; शिंदे-फडणवीस दिल्लीत असतानाच बैठक झाल्याने चर्चा
खा. कृपाल तुमाने
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली: शिवसेनेतील (shivsena) आमदारांचं बंड ताजं असतानाच आता शिवसेनेचे खासदारही वेगळा निर्णय घेण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या दहा खासदारांची काल रात्री दिल्लीत गुपचूप खलबतं झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या तंबूत एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांना वगळून या दहाही खासदारांची बैठक झाली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत असतानाच शिवसेना खासदारांची बैठक झाली आहे. शिंदे-फडणवीस यांचं दिल्लीत येणं आणि शिवसेनेच्या खासदारांनी बैठक घेणं हा योगायोग जुळून आल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. शिवाय हे खासदार एकनाथ शिंदे (eknath shinde) यांची भेट घेण्याची जोरदार चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू असून आज संध्याळपर्यंत त्याबाबतचं चित्रं स्पष्ट होणार असल्याचंही सांगितलं जात आहे.

शिवसेनेचे नागपूरचे रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांच्या पुढाकाराने शिवसेना खासदारांची ही बैठक पार पडली. तुमाने यांच्या दिल्लीतील बीकेसी मार्गावरील निवासस्थानी ही बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेनेचे 10 खासदार उपस्थित होते. यावेळी या सर्व खासदारांनी एकत्र जेवण घेत गप्पाही मारल्या. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. पक्षाची सध्याची स्थिती, राजकीय आणि कायदेशीरKrupal Tumane पेचप्रसंग, राज्यातील बदलती समीकरणे, राष्ट्रपतीपदाची निवडणूक आणि 2024च्या निवडणुकीच्या अनुषंगाने या खासदारांनी चर्चा केल्याचं सांगितलं जातं.

हे सुद्धा वाचा

शिंदेंची भेट घेणार?

दरम्यान, डिनर डिप्लोमसीच्या माध्यमातून हे दहाही खासदार उद्धव ठाकरे यांना धक्का देण्याचा प्रयत्न असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच हे सर्व खासदार आज एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्र सदनात भेट घेणार असल्याचीही माहिती आहे. त्यामुळे शिवसेनेचे सर्व खासदार आणि शिंदे यांच्या या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीला उपस्थित असलेल्या इतर नऊ खासदारांची नावे कळू शकली नाहीत. मात्र, शिंदे-फडणवीस दिल्लीत असताना झालेल्या या बैठकीमुळे राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

शेवाळेंची मागणी

दरम्यान, या पूर्वीच शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटून एक पत्रं दिलं होतं. त्यात त्यांनी राष्ट्रपतीपदासाठी भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची मागणी केली होती. त्यानंतर इतर खासदारांनीही भेटून उद्धव ठाकरेंकडे हीच मागणी केली होती. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुखांची चांगलीच कोंडी झाली आहे.