भाजपवाल्यांनो भाडोत्री बाप तुम्हालाच लखलाभ असो, माझा बाप हा महाराष्ट्र- उद्धव ठाकरे

| Updated on: Oct 25, 2020 | 8:22 PM

आमच्या लग्नात आलेला आहेर बापाने पळवून नेला. आहेराचे पैसे मोजून परत देतो, असे त्याने सांगितले. | CM Uddhav Thackeray

भाजपवाल्यांनो भाडोत्री बाप तुम्हालाच लखलाभ असो, माझा बाप हा महाराष्ट्र- उद्धव ठाकरे
Follow us on

मुंबई: राज्य सरकारने केंद्राकडे जीएसटीचे थकलेले पैसे मागण्यात काहीही गैर नाही. आम्ही हे पैसे मागितले तर भाजप नेते टीका करतात. तुम्ही लग्न केलं आणि आता बापाकडे पैसे कशाला मागता, असे रावसाहेब दानवे यांनी म्हटले. मात्र, माझा बाप केंद्रात नाही. तो भाडोत्री बाप तुम्हालाच लखलाभ असो. माझा बाप महाराष्ट्राच हाच आहे, माझ्या विचारातून आणि कृतीतून वेळोवेळी त्याचे अस्तित्त्व तुम्हाला दिसून येईल, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. ( CM Uddhav Thackeray hits back BJP over GST refund)

गेल्या काही दिवसांपासून केंद्राकडून वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) नुकसानभरपाईच्या थकित रक्कमेवरून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रणकंदन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा उल्लेख करत भाजप नेत्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले. रावसाहेब दानवे म्हणतात, तुम्ही लग्न केलं आणि आता बापाकडे पैसे कशाला मागता? पण मला त्यांना हे सांगायचं आहे की, आमच्या लग्नात आलेला आहेर बापाने पळवून नेला. आहेराचे पैसे मोजून परत देतो, असे त्याने सांगितले. मात्र, अजूनही बाप पैसे मोजतच बसलाय, अशी खोचक टिप्पणी उद्धव ठाकरे यांनी केली.

राज्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाला मदत करण्यासाठी केंद्र सरकारने राज्याला मदत करावी, अशी मागणी मध्यंतरी महाविकासआघाडीच्या नेत्यांनी केली होती. केंद्राकडून जवळपास 37 हजार कोटी रुपयांचे येणे बाकी, असल्याचेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जोरदार प्रतिवाद करण्यात आला होता. केंद्र सरकार महाराष्ट्राला मदत देईल. परंतु, सर्वप्रथम राज्य सरकार काय करणार, हे स्पष्ट करावे. सर्व जबाबदारी केंद्र सरकारच्या अंगावर झटकून मोकळे होऊ नका, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.

काळी टोपी घालणाऱ्यांनो, सरसंघचालक हिंदुत्वाबाबत काय म्हणतात ते समजून घ्या; उद्धव ठाकरेंचा हल्ला
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना मानणाऱ्यांनी त्यांनी सांगितलेल्या हिंदुत्वाचा अर्थ समजून घ्यावा. नुसत्या काळ्या टोप्या घालू नका. त्याखाली डोकं असेल हिंदुत्व समजून घ्यावं, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

हिंदुत्वाबाबत काही लोक भ्रम पसरवित आहेत. हिंदुत्वाचा अर्थ पूजेशी जोडून संकुचित करत आहेत, असं भागवत म्हणाले. त्यामुळे भागवतांनी सांगितलेला हा अर्थ समजून घ्या, असा टोला उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपला नाव न घेता लगावला.

संबंधित बातम्या: 

बेडूक आणि त्याची पिल्लं वाघ पाहून ओरडत सुटलेत; उद्धव ठाकरेंचा राणे कुटुंबीयांवर सॉल्लिड प्रहार

Live | आम्ही तुमच्यासारखे गुळाच्या ढेपाला चिकटणारे मुंगळे नाहीत, पण वाटेला जाल तर…, उद्धव ठाकरेंचा दसरा मेळाव्यात इशारा

CM Uddhav Thackeray Speech | हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा, उद्धव ठाकरेंचे विरोधकांना आव्हान

( CM Uddhav Thackeray hits back BJP over GST refund)