विनायक डावरुंग प्रतिनीधी : मुंबई : यंदा प्रथमच दसरा मेळावा (Dussehra Gathering) होण्यापूर्वीच त्याची चर्चा सुरु झालेली आहे. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क (Shivaji Park) मैदान मिळावे यासाठी शिवसेनेने दरवर्षाप्रमाणे यंदाही महापालिकेकडे अर्ज केला होता. पण या मैदानावर मेळावा घेता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आता शिवसेनेने कोर्टात (Court) धाव घेतली असून कोर्टाचा निकाल काहीपण असो मेळावा हा शिवतिर्थावरच होणार असा निर्धार शिवसेना नेत्यांनी केला आहे. अंबादास दानवे यांनी कोर्ट इतिहास पाहून योग्यच निकाल देईल पण कायदा-सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होईल असे सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे.
महापालिकेच्या नकारामुळे शिवसेनेचा दसरा मेळावा कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. पण दुसरीकडे मेळाव्याच्या कार्यक्रमाची रुपरेषाच शिवसेनेकडून ठरवली जात आहे. मेळाव्यात प्रथम शिवसेना प्रमुख यांचे विचार ऐकायला मिळतील आणि त्यानंतर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे संबोधित करणार आहेत.
महापालिकेने जरी नकार दिला असला तरी शिवसेनेला कार्टाच्या निकालावर विश्वास आहे. गेल्या 56 वर्षांपासून या मैदानावर कोण मेळावा घेतो याची जाणीव कोर्टाला असल्याचे अंबादास दानवे म्हणाल आहेत. त्यामुळे महापालिकेच्या नकारानंतर आता कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष आहे.
शिवसेनेचा दसरा मेळावा ही शिवतीर्थावरच यावर अनेक नेते ठाम आहेत. खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही मुंबईतील मेळाव्यात याचा पुन्नरउच्चार केला आहे. त्यामुळे आता मेळाव्याला परवानगी मिळाली नाहीतर मात्र, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असेही, दानवे म्हणाले आहेत.
महापालिकेच्या नकारानंतर शिवसेनेने कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे या पक्षाकडून सर्वकश प्रयत्न केले जात आहेत. शुक्रवारी यावर सुनावणी होणार असून कोर्टाच्या निकालानंतर शिवसेना काय भूमिका घेणार यावरही सर्वकाही अवलंबून आहे.