मुंबई : शिवसेनेच्या (Shiv Sena) खासदार प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी पुन्हा एकदा शिंदे (Eknath Shinde) गटावर निशाणा साधला आहे. बाळासाहेबांचे विचार स्पष्ट होते, कोणासोबत गद्दारी करायची नाही, मात्र तुम्ही तर पाठीत खंजीर खूपसल्याचे प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटलं आहे. गद्दारी आणि विश्वासघात ही केसरकर आणि 40 आमदारांची प्रायव्हेट प्रॉपर्टी बनली असल्याची जोरदार टीका प्रियंका चतुर्वेदी यांनी केली आहे. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की आणखी दहा दिवस शिंदे गटासाठी चांदणी रात्र आहे. या दहा दिवसांमध्ये जी मनमानी करायची ती करा. मात्र 22 तारखेला कोर्टाचा निकाल येईल. त्यानंतर पुढील सर्व रात्री या शिंदे गटासाठी काळोखाच्या रात्री असतील. आम्हाला विश्वास आहे की न्यायालयात आम्हाला न्याय मिळेल असे प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी यावेळी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.
प्रियंका चतुर्वेदी यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांवर जोरदार टीका केली आहे. पुढील दहा दिवस शिंदे गटासाठी चांदणी रात्र आहे. 22 तारखेला कोर्टाचा निकाल येईल. त्यानंतर येणाऱ्या सर्व रात्री या शिंदे गटासाठी काळोख रात्री असतील. त्यामुळे या दहा दिवसांमध्ये काय मनमानी करायची ती करून घ्या. तुम्ही पाठीत खंजीर खूपसला, बाळासाहेबांचे विचार स्पष्ट होते, कोणासोबतही गद्दारी करायची नाही. मात्र आता गद्दारी आणि विश्वासघात ही केसरकर आणि 40 आमदारांची प्रायव्हेट प्रॉपर्टी बनली असल्याचं प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यावेळी त्यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. चित्रा वाघ यांनी केलेल्या टीकेला प्रियंका चतुर्वेदी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. चित्रा वाघ या सर्वज्ञानी आहेत, मात्र सध्या पक्षात त्यांची अवस्था न घर का न घाट का अशी झाली आहे. संजय राठोडांविरोधात त्यांनी एवढा संर्घष केला मात्र त्यांचे पक्षात कोणही ऐकले नसल्याचं प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटलं आहे.