जखमी वाघीण नेटाने लढली, बंगालच्या विजयाची मशाल देशभर प्रकाश पाडेल : संजय राऊत

| Updated on: May 02, 2021 | 3:57 PM

पश्चिम बंगालचा विजय देशाच्या राजकारणाला दिशा देणारा आहे. बंगालच्या विजयाची मशाल देशभर प्रकाश पाडेल, असे संजय राऊत म्हणाले. (sanjay raut west bengal election results 2021)

जखमी वाघीण नेटाने लढली, बंगालच्या विजयाची मशाल देशभर प्रकाश पाडेल : संजय राऊत
संजय राऊत, खासदार, शिवसेना
Follow us on

मुंबई : पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक (est Bengal election results 2021) मोठ्या धामधुमीत पार पडल्यानंतर आता येथील निकाल जवळजवळ स्पष्ट झाले आहेत. येथे ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने एकहाती विजय मिळवून भाजपच्या स्वप्नांना सुरुंग लावला आहे. ममतांच्या या विजयानंतर आता देशभरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीसुद्धा ममतांच्या (Mamata Banerjee) विजयामुळे देशातील राजकारण बदलू शकते असे सूचक वक्तव्य केले आहे. “एका स्त्रीने जिला आम्ही बंगालची वाघीण म्हणतो. ती निवडणुकीच्या काळात जखमी झाली. व्हिलचेअर फिरत होती. मात्र तिने बंगालमध्ये एकहाती विजय प्राप्त केला. हा विजय देशाच्या राजकारणाला दिशा देणारा आहे. बंगालच्या विजयाची मशाल देशभर प्रकाश पाडेल,” असे संजय राऊत म्हणाले. पश्चिम बंगालसह इतर चार राज्यांच्या विधनासभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी वरील वक्तव्य केले. (Shivsena leader Sanjay Raut comment on West Bengal election results 2021 said Mamata Banerjee victory will give direction to Indias politics)

पोकळ वादळाचा पराभव झाला

पश्चिम बंगालमधील विधासनभा निवडणुकीचे निकाल जवळजवळ स्पष्ट झाले आहेत. अजूनही मतमोजणी सुरु आहे. मात्र, यावेळी येथे पुन्हा एकदा ममता यांचाच बोलबाला असल्याचे पाहायला मिळाले. त्यावर संजय राऊत यांनी चौफेर भाष्य केले. ” बंगालमध्ये ज्या प्रकारे कृत्रीम वादळ निर्माण केलं गेलं होतं. सरकारी यंत्रणेचा वापर करुन अनेक राज्यातील मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री तिथे बसवण्यात आले होते. देशात कोरोनाचे संकट असूनसुद्धा देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री तिथे तळ ठोकून बसले होते. या लोकानी बंगालमध्ये लाखोंच्या सभा घेतल्या. या सगळ्या पोकळ वादळाचा पराभव झाला,” असे संजय राऊत म्हणाले.

कोरोनाला वाऱ्यावर सोडून बंगालमध्ये डेरा टाकून बसले

तसेच पुढे बोलताना त्यांनी ममता यांच्या एकहाती विजयावर भाष्ये केले. तसेच देशातील कोरोनास्थिती आणि त्याबाबतचा केंद्र सरकारचा दृष्टीकोन याबाबतसुद्धा राऊत यांनी परखड भाष्य केलं. “एका स्त्रीने जिला आम्ही बंगालची वाघीण म्हणतो. ती या काळात जखमी झाली. त्या व्हिलचेअर फिरत होत्या. त्यांनी बंगालमध्ये एकहाती विजय प्राप्त केला. त्यांचा विजय हा देशाच्या राजकारणाल दिशा देणारा आहे. आपल्याला कोरोनाचा पराभव करायचा होता. मात्र, केंद्र सरकार कोरोनाला वाऱ्यावर सोडून ममतांच्या पराभावासाठी बंगालमध्ये डेरा टाकून बसले होते. पण तसं काही झालं नाही. ममता येथे मोठ्या बहुमताने विजयी झाल्या. त्यानंतर देशात कोरोनाची जी परिस्थिती झाली त्याला उच्च न्यायालय आणि मद्रास कोर्टाने मान्य केलं,” असे राऊत म्हणाले.

दरम्यान, सध्या पश्चिम बंगालमध्ये मतमोजणी सुरु आहे. मात्र, सुरुवातीला आलेल्या निकालावरुन सध्या येते ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचीच सरशी झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. भाजप 100 चा आकडा गाठेल की नाही, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. या निकालानंतर राऊत यांनी देशाच्या राजकारणाबद्दल केलेल्या भाष्याला आता विशेष महत्त्व आले आहे.

इतर बातम्या :

Pandharpur Election Result 2021 Live | हा विजय जनतेचा, लोकांची ताकद पाठीशी : समाधान आवताडे

2021 Vidhan Sabha Election Results LIVE : केरळमध्ये डावे, तामिळनाडूमध्ये द्रमुक, आसाम, पुद्दुचेरीमध्ये एनडीएची सत्ता

West Bengal Election Results 2021 LIVE: नंदीग्राम मतदारसंघात चुरशीची लढत; ममता बॅनर्जी अवघ्या 6 मतांनी पिछाडीवर

(Shivsena leader Sanjay Raut comment on West Bengal election results 2021 said Mamata Banerjee victory will give direction to Indias politics)