मुंबई : गुणरत्न सदावर्ते(Gunaratna Sadavarte) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत ते त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे. आपल्या ‘डंके की चोट’साठी परिचीत असलेल्या सदावर्तेंनी आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची(RSS) तुलना थेट बौद्ध भिख्खू संघासोबत केली आहे. शिवसेना नेत्या सुषमा अंधारेंनी(Sushma Andhare) सदावर्तेंना अर्धवटराव म्हणत RSS आणि बौद्ध भिख्खू संघातील फरक स्पष्ट केला आहे.
आरएसएस आणि भिख्खू संघ अशा दोनच संघांचे विचार विचार जागतीक विचार आहेत असे सदावर्ते यांनी म्हंटले आहे. त्यांचे हे वक्तव्य सुषमा अंधारे यांनी खोडून काढले आहे.
पर्यटक गांधी स्मारक, दीक्षाभूमी बघतात. संघ मुख्यालय बघायला कोणीही येत नाही. सदावर्ते हे नेहमी अतार्किक आणि असंबंध बोलतात अशी टीका अंधारे यांनी केली आहे.
आरएसएस आणि भिख्खू संघ यांचे विचार कधीच कोणासोबत हिंसा करणार नाही, असंही सदावर्ते यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भिकू संघ यांची तुलनाच होऊ शकत नाही. जाती धर्म या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन इथल्या मनोवादी विचारसरणीला भिकू संघ विरोध करतो.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय आहे आणि भिकू संघ काय आहे हे गुणरत्न सदावर्तेन सारख्या अर्धवट रावांना समजणारच नाही असे अंधारे म्हणाल्या.